शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पुण्यात देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप : विक्रम कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 19:27 IST

पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुढील दीड वर्षांत अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे....

ठळक मुद्देपीएमआरडीए आणि स्वित्झरलँड सरकार एकत्र साकारणार 

पुणे : पुणे जिल्ह्यात भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन व पीएमआरडीए यांच्या सहकार्यामधून पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, स्मार्ट, शाश्वत टाऊनशिपाची उभारणी करणार आहे. त्याबाबतचा करार आज करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत यांनी एका कार्यक्रमात या सामंजस्य करारावर सह्या केल्या. याप्रसंगी स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, मुख्य अभियंते विवेक खरवडकर, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे स्थानिक भागीदार निखील दिक्षीत उपस्थित होते.विक्रम कुमार म्हणाले, जागतिक स्तरावर भारताला उदयोन्मुख विकास केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए विभागात कार्बन न्यूट्रल असलेली, स्मार्ट, शाश्वत व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य टाऊनशिप विकसित व्हाव्यात या दृष्टीने आम्ही सकारात्मक पाऊले उचलत आहोत. स्वित्झरलँड सरकार यासाठी आम्हाला मदत करीत आहे. त्याद्वारे सर्व्हिस इंडस्ट्री क्लस्टर, अ‍ॅग्रीकल्चर क्लस्टर व टुरिझम क्लस्टर अशा संकल्पनेवर एकूण १२ टाऊनशिप उभारण्याचा आमचा मानस आहे. जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून केलेल्या सीओपी २१ पॅरिस कराराने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार नियामक आराखड्याचा अवलंब करीत स्वित्झरलँड सरकार या आधीपासून कार्यरत आहे.२००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकाराने  पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुढील दीड वर्षांत अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने कार्बन न्यूट्रल असणारी, स्मार्ट टाऊनशिप देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी माधव भागवत यांनी सांगितले........................भारत व स्वित्झरलँड या दोन्ही देशात तब्बल ७१ वर्षांचे मैत्रीपूर्ण सख्य आहे. शाश्वत विकासासंदर्भात स्वित्झरलँड नेहमीच भारताला मदत करण्यासाठी तयार असेल. आमच्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव या क्षेत्रातील ज्ञान याद्वारे आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. - ओथमार हारदेगार, स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल

 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारSwitzerlandस्वित्झर्लंडbusinessव्यवसाय