शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचा उन्हाळा होणार सुखकर : शहरातील उद्याने रात्री ९ पर्यंत राहणार खुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:22 IST

पुणे शहराची ओळख उद्यानांचे शहर म्हणून आजही कायम आहे. शहरामध्ये सध्या तब्बल २०० लहान-मोठी उद्याने आहेत.

पुणे: गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून, पुण्यामध्ये देखील यंदाचा उन्हाळा असाह्य होऊ लागला आहे. यामुळेच महापालिकेने शहरातील सर्व उद्याने रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याने विभागाने काढलेल्या अध्यादेशात १५ जूनपर्यंत सर्व उद्याने रात्री ९ पर्यंत खुली राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.     पुणे शहराची ओळख उद्यानांचे शहर म्हणून आजही कायम आहे. शहरामध्ये सध्या तब्बल २०० लहान-मोठी उद्याने आहेत. यामध्ये शहरातील काही उद्यांनामध्ये वर्षभर नेहमीच गर्दी असते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वर्गीय पु. ल. देशपांडे उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारसबाग, कमला नेहरू उद्यान, हडपसर येथील लोहिया उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, वडगावशेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशा प्रमुख आणि मोठ्या उद्यानांचा समावेश आहे. या उद्यांनामध्ये उन्हाळ््याच्या सुट्टीत रात्री उशीरापर्यंत प्रचंड गर्दी होते. या उद्यानांसाठी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या उद्यानात पर्यंटक तसेच बालचमूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सुविधेसाठी आता सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSummer Specialसमर स्पेशल