पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले : कर्नल चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST2021-08-29T04:13:54+5:302021-08-29T04:13:54+5:30

एनसीसीमधील सेकंड गर्ल्स बटालीयनचे प्रमुख कर्नल विनायक चव्हाण हे आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ...

Punekars gave a lot of love: Colonel Chavan | पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले : कर्नल चव्हाण

पुणेकरांनी भरभरून प्रेम दिले : कर्नल चव्हाण

एनसीसीमधील सेकंड गर्ल्स बटालीयनचे प्रमुख कर्नल विनायक चव्हाण हे आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नूतन सीओ कर्नल अनिरुद्ध वाले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल. या वेळी सुभेदार मेजर लक्ष्मण राजले यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी सिनिअर जीसीआय रिटा खंडागळे, दीपाली धस, कॅप्टन खाशिफा इनामदार, चीफ ऑफिसर आशा धेंडे, सेकंड ऑफिसर संध्या पंचमुख, यशोधिनी कुलकर्णी, अनिता गायगोळे, सुरेश पानसरे, गणपत जावीर, रजणजीत खोमणे, सुरज जाधव, चेनत गोपाळघरे आदी उपस्थित होते.

कर्नल चव्हाण हे १७ डिसेंबर १९८८ मध्ये सैन्यदलात दाखल झाले होते. २५ ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी पुणे ग्रुपमधील गर्ल्स बटालीयनची धुरा हाती घेतली. कोविडच्या काळात त्यांनी लसीकरण मोहिमेत नोडल ऑफिसर म्हणून काम केले, त्याअंतर्गत अनेक कॅडेटना लसीकरण केंद्रावर बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्या साऱ्या कॅडेटची काळजी घेण्यापासून ते त्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी उत्तम काम केले. कॅडेटच्या घराघरामध्ये वृक्षारोपणाची अनोखी मोहीम त्यांनी यशस्वी पार पाडली. याशिवाय फिट इंडिया, आत्मनिर्भर अभियान, योगादिन, डिजिटल फोरम, ऑनलाईन क्लासेस आदी उपक्रम त्यांनी उत्तम हाताळले.

--

फोटो : २८ एनसीसी रिटायरमेंट

फोटो ओळी - कर्नल विनायक चव्हाण यांचा सत्कार करताना कर्नल अनिरुद्ध वाले.

--

फोटो : २८ सुभेदार मेजर लक्ष्मण राजले

Web Title: Punekars gave a lot of love: Colonel Chavan