पुणेकर म्हणतात, हेल्मेटमुळे पडते टक्कल
By Admin | Updated: February 7, 2016 04:05 IST2016-02-07T04:05:02+5:302016-02-07T04:05:02+5:30
हेल्मेटसक्ती चुकीची आहे... हेल्मेट वापरल्यामुळे थोडीच अपघात कमी होणारेत... उलट हेल्मेटवापरामुळे डोक्यावरची केस कमी होतात, टक्कल पडते, आजू-बाजूचे ऐकू येत नाही.

पुणेकर म्हणतात, हेल्मेटमुळे पडते टक्कल
पुणे : हेल्मेटसक्ती चुकीची आहे... हेल्मेट वापरल्यामुळे थोडीच अपघात कमी होणारेत... उलट हेल्मेटवापरामुळे डोक्यावरची केस कमी होतात, टक्कल पडते, आजू-बाजूचे ऐकू येत नाही... नीट दिसत नाही... मान, खांदे दुखतात... अशी विविध हास्यास्पद कारणे सध्या पुण्यात ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू झाल्याने धास्तावलेल्या पुणेकरांकडून त्याला विरोध करण्यासाठी अशी तर्क नसलेली कारणे दिली जात आहेत.
राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश देताच त्याची अंमलबजावणी शहर वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे पुणेकर धास्तावले आहेत. काही पुणेकरांकडून, संघटना आणि राजकीय पक्षांकडून या सक्तीला विरोध केला
जात आहे. त्याविरोधात नागरिक
रस्त्यावरही उतरू लागले आहेत. मात्र
दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे आणि त्यामुळे अपघात झाल्यास प्राण वाचू शकतात, याकडे हे विरोध करणारे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
अशा वेळी अनेक पुणेकर मला हेल्मेट वापरल्यामुळे मानदुखी होते, मला स्पाँडिलायसिसचा त्रास आहे, असे सांगताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर हेल्मेट वागवणे गैरसोईचे आहे, त्याची आवश्यकता नाही, हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला घाम येतो आणि तो डोक्यात मुरून
डोके दुखू लागते, मान वळवता येत नाही, शेजारून जाणाऱ्या वाहनांचा अंदाज
येत नाही, अशी विविध हास्यास्पद करणे
देत आहेत. काही जण तर हेल्मेट
नसल्यामुळे अपघातामध्ये मृत्यू होत नाहीत अशीही तर्कसंगत नसलेली कारणे देताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्न
दिवसभरात शहरात पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या ४ ते ५ हजार दुचाकीस्वारांकडून दंडाची आकारणी केली जात आहे. अचानक पोलिसांनी थांबविल्याने आणि लायसन्स असतानाही केवळ हेल्मेट नाही, म्हणून दंड आकारण्यावरून पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये वादही होताना दिसून येत आहेत. काही वेळा पोलीस दुचाकीस्वारांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र अनेकदा त्यांचे म्हणणे दुचाकीस्वार ऐकत नसल्याचे चित्र आहे.