शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

...अाणि काही मिनिटांसाठी सावलीने साथ साेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 14:01 IST

झीराे शॅडाे डे अर्थात शून्य सावली दिवसाचा अनुभव रविवारी दुपारी 12.31 वाजता पुणेकरांनी घेतला. हा क्षण पाहण्यासाठी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी केसरीवाड्यात गर्दी केली हाेती.

पुणे : दुपारी बाराची वेळ, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी पुण्यातील केसरीवाड्यात गर्दी केली हाेती. कधीही अापली साथ न साेडणारी सावली काहीवेळासाठी सगळ्यांची साथ साेडणार हाेती. अापली सावली नेमकी अापली साथ कशी साेडते हे पाहण्याचे सर्वांमध्ये कुतुहल हाेते. अाणि अखेर ती वेळ अालीच रविवारी दुपारी ठिक 12 वाजून 31 मिनिटांनी पुण्यात सुर्य बराेबर डाेक्यावर अाला अाणि काही मिनिटांसाठी सावलीने अखेर साथ साेडली.     झीराे शॅडाे डाे अर्थात शून्य सावलीचा दिवस साेमवारी पुण्यात अनुभवायला मिळाला. पुण्याच्या ज्याेतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने केसरीवाडा येथे या शून्य सावलीच्या निरिक्षणाचे अायाेजन करण्यात अाले हाेते.यासाठी दुपारी 11 पासूनच लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच गर्दी केली हाेती. दुपारी 12.31 वाजता अखेर ताे क्षण अाला ज्याची प्रत्येकजण अातूरतेने वाट पाहत हाेते. काही वेळासाठी प्रत्येकाची सावली बराेबर त्यांच्या पायाखाली अाली हाेती. अनेकांनी हा क्षण अापल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केला. लहान मुले भर उन्हात उभे राहून अापली सावली कशी हरवते याचे निरिक्षण करत हाेते. ज्याेतिर्विद्या परिसंस्थेतर्फे येते दुर्बिणीतून साैर डागांचे निरिक्षण करण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था सुद्धा करण्यात अाली हाेती. तसेच हळूहळू सुर्य डाेक्यावर येत असताना सावलीमध्ये हाेणारे बदलही यावेळी टिपण्यात अाले. यावेळी उपस्थित नागरिकांना शून्य सावली दिवसाबद्दल माहिती देण्यात अाली. 

    उत्तरायण-दक्षिणायनामुळे सुर्य खगाेलिय विषुववृत्ताच्या 23.5 अंश उत्तरेला व दक्षिणेला प्रवास करताे. यामुळे 21 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान ज्यावेळेस सूर्य खगाेलीय विषुववृत्त पार करत असताे, तेव्हा पृथ्वीवरील विषुववृत्तावर स्थानिक वेळेनुसार 12 वाजता सूर्य बराेबर डाेक्यावर  म्हणजेच ख-मध्य या बिंदूवर येताे. यानंतर उत्तरेला प्रवास करताना, सूर्य अापल्या शहराच्या अक्षांशाइतक्या अंशावर अाला, की त्या दिवशी अापल्या शहरात सूर्य स्थानिक वेळेनुसार बारा वाजता डाेक्यावर  येताे व ताे दिवस अापल्या शहरासाठी झीराे शॅडाे डे असताे. पुण्याचे अक्षांश 18.5 अंश असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करताना 13 मे राेजी ख-मध्य बिंदू पार केला व यावेळी स्थानिक वेळेनुसार बारा वाजता म्हणजेत भारतीय प्रमाणवेळेनुसार 12 वाजून 31 मिनिटांनी अापली सावली दिसेनाशी झाली अशी माहिती ज्याेतिर्विद्या परिसंस्थेच्या सिद्धार्थ बिरमल यांनी दिली. 14 मे राेजी सुद्धा दुपारी याच वेळेला पुणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेZero Shadow Dayशून्य सावली दिवसkesri wadaकेसरी वाडाStudentविद्यार्थी