शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026 : भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादीचा विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:26 IST

भिगवण-शेटफळगढे गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत आपला प्रभाव पुन्हा सिद्ध केला आहे.

भिगवण : भिगवण-शेटफळगढे गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्लेखनीय यश मिळवत आपला प्रभाव पुन्हा सिद्ध केला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणाचा थेट फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना झाल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.भिगवण-शेटफळगढे गटातून राष्ट्रवादीच्या मेघना तुकाराम बंडगर यांनी तब्बल १५,१४६ मतांनी विजय मिळवला. त्याचप्रमाणे गणातून हेमा पद्माकर माडगे यांनी ९,५११ मतांनी, तर शेटफळगढे गणातून जितेंद्र प्रल्हाद वणवे यांनी १,३६२ मतांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.तिरंगी लढतीत राष्ट्रवादी वरचढया निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती. अपक्ष उमेदवार सोनाली बंडगर दुसऱ्या स्थानी राहिल्या, तर भाजपाच्या कोमल बंडगर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्र येत राष्ट्रवादीच्या गटबांधणीला बळ दिले. दोन्ही गटांनी एकत्र लढल्याचा सकारात्मक परिणाम इंदापूर तालुक्यात स्पष्टपणे दिसून आला.शांत प्रचार, पण प्रभावी रणनीतीअजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने मोठ्या जाहीर सभा टाळत संयमित प्रचारावर भर दिला. स्थानिक विकासकामे आणि दिवंगत नेत्यांनी केलेल्या प्रकल्पांची आठवण मतदारांना करून देत शेवटच्या टप्प्यात भावनिक साद घालण्यात आली. ही रणनीती निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.विकासकामे आणि भावनिक लाट यांची सांगडभिगवण-शेटफळगढे परिसरात झालेला विकास आणि नेतृत्वावरील विश्वास यासोबत सहानुभूतीची लाट एकत्र आल्याने राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला. आगामी स्थानिक राजकारणात या निकालाचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP triumphs in Bhigvan-Shetfalgadhe group at Pune ZP Election 2026

Web Summary : Nationalist Congress Party (NCP) secured victory in Bhigvan-Shetfalgadhe, Pune ZP election, fueled by sympathy after Ajit Pawar's death. Meghana Bandgar won by a significant margin. The victory showcases NCP's dominance, aided by strategic alliances and emphasizing local development projects. Future political impact is anticipated.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६PuneपुणेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५