शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026 :जुन्नर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा झेंडा, पंचायत समितीत शिंदे गट मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:42 IST

जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे.

नारायणगाव -  जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत आघाडी घेतली, तर शिवसेना (शिंदे) गटाने ३ जागांवर यश संपादन केले. शिवसेना (ठाकरे) गटाला १ जागेवर समाधान मानावे लागले.पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये मात्र शिवसेना (शिंदे) गटाने ८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या असून भाजपाने १ जागा जिंकली. हा भाजप सदस्य शिवसेनेसोबत गेल्यास पंचायत समितीवर पुन्हा भगवा फडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दिग्गजांना धक्काया निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुना कविता पवार, आमदार शरद सोनवणे यांचे निकटवर्तीय संतोष चव्हाण तसेच जयश्री खंडागळे यांचा पराभव विशेष चर्चेत राहिला.जिल्हा परिषद गटानुसार निकाल (संक्षेप)डिंगोरे-उदापूर: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी) विजयीओतूर-धालेवाडी: छाया तांबे (राष्ट्रवादी) विजयीआळे-पिंपळवंडी: मंगेश काकडे (शिंदे) विजयीबेल्हे-राजुरी: स्मिता कणसे (शिंदे) विजयीबोरी बुद्रुक-खोडद: कल्पना काळे (राष्ट्रवादी) विजयीनारायणगाव-वारूळवाडी: नेहा पाटे (शिंदे) विजयीसावरगाव-कुसूर: गुलाबराव पारखे (ठाकरे) विजयीबारव-तांबे: मोनाली लांडे (राष्ट्रवादी) विजयी पंचायत समितीत रंगतदार लढतीउदापूर, डिंगोरे, ओतूर आणि धालेवाडी येथे राष्ट्रवादीने विजय मिळवला, तर आळे, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे, नारायणगाव, वारूळवाडी, तांबे व खोडद येथे शिवसेना (शिंदे) गटाने बाजी मारली. सावरगावमध्ये भाजप, तर कुसूरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या काही उमेदवारांना पराभवाचा धक्का बसल्याने पक्षांतराचा मुद्दाही चर्चेत आला. प्रतिष्ठेच्या लढतीत मोनाली लांडे विजयीबारव-तांबे गटात राष्ट्रवादीने मोनाली लांडे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या शिफारशीने मिळालेल्या उमेदवारीचे त्यांनी सोने करत विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मतमोजणी व्यवस्थेवर नाराजीसात फेऱ्या पूर्ण होऊनही निकाल जाहीर करण्यात विलंब झाल्याने पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. माहिती उशिरा दिल्याचा आरोप करण्यात आला.कर्मचारी जेवणावरही टीकामतमोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या जेवणाच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त झाले. भाजीला चव नसल्याची तक्रार अनेकांनी केली. विजयाचा जल्लोषनिकाल जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन मिरवणुका काढण्यात आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Junnar ZP Election: NCP Wins, Shinde Group Strong in Panchayat Samiti

Web Summary : NCP secured victory in Junnar ZP election with 4 seats. Shinde group dominates Panchayat Samiti with 8 seats, potentially holding power. Key leaders faced unexpected defeats.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५PuneपुणेJunnarजुन्नर