शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक सुरु होण्याआधीच वादात ;अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली तरी हॉल बंदच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:06 IST

संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे. 

पुणे : पुणेजिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याआधीच वादात अडकली आहे. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी सुरु न करता दुसऱ्याच ठिकाणी सुरु करण्यात आल्याने अनेक सदस्यांना अर्ज भरता आला नाही. संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे. 

  याबाबत अधिक माहिती अशी की,  जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका विरोधी पक्षातील इच्छुक सदस्यांना बसला. जिल्हाधिकारी प्रशासनाने निवडणूक परिपत्रकानुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ही जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार होती. अर्ज भरण्याची वेळ ही 11 ते 1 वाजेपर्यंत होती. यामुळे भाजपचे इच्छुक सदस्यांनी अर्ज भरण्यासाठी 11 वाजल्यापासून सभागृहाबाहेर बसले होते.

जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, जयश्री पोकळे, भाजपचे गटनेते शरद बुट्ट पाटील आणि आणखी काही सदस्यांचा यात समावेश होता. मात्र एक वाजून गेल्यावरही सभागृहाचे दारही उघडण्यात आले नव्हते. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा झाली. आणि प्रशासनाकडून पाचव्या मजल्यावर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. हे विरोधी सदस्यांना समजताच त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली. त्यांनी या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ई-मेल आणि फोनद्वारे तक्रार केली. विरोधी सदस्यांना निवडणुकीपासून दूर ठवण्याचा डाव असल्याच्या आरोप त्यांनी केला.ही निवडणूक प्रक्रिया थांबली पाहिजे अन्यथा या विरोधात न्यायालयात जाण्याच्या इशारा आशा बुचके यांनी दिला.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदPuneपुणेPoliticsराजकारण