शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणाचा अहमदनगरमध्ये खून; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:46 IST

प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.शेखर पाचवे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. २३) कोथरुडमधून त्याचे अपहरण करण्यात आले. तर अहमदनगर येथील कर्जत या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मृत शेखर विवाहित असून त्यास दोन मुले आहेत. परंतु, तरीही आरोपीच्या नातेवाईक मुलीसोबत त्याचे संबध होते. या वरून वाद झाल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी मृत शेखर घरगुती कामानिमित्त कोथरुड परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी त्याला समजून सांगण्यासाठी गेले ह़ोते, मात्र त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण करत चारचाकीमध्ये बसवत अपहरण केले. नगर जिल्ह्यतील कर्जत या गावी घेऊन जाऊन त्याचा निर्घृण खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस