पुणे जितो यूथ विंग देशातील नंबर एक बनवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:29+5:302021-02-05T05:20:29+5:30
पुणे : जितो ही संस्था व्यापार वाढविण्यासाठी बनलेली आहे. या विंगची जेबीएनद्वारे खूप प्रगती होईल, असा विश्वास जितो पुणेचे ...

पुणे जितो यूथ विंग देशातील नंबर एक बनवणार
पुणे : जितो ही संस्था व्यापार वाढविण्यासाठी बनलेली आहे. या विंगची जेबीएनद्वारे खूप प्रगती होईल, असा विश्वास जितो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी व्यक्त केला.
जितो यूथ विंगच्या वतीने जेबीएन सुरू केले आहे. यामध्ये जितोमधील ३६ वर्षांच्या आतील युवा उद्योजकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र मध्ये सुमारे १६० युवकांनी यामध्ये नोंदणी केली आहे. पुण्यातील सुमारे ४० युवकांनी या पहिल्या जेबीएन मिटिंगमध्ये सहभाग नोंदवला.
ओमप्रकाश रांका यांनी सांगितले की, यूथ ही जितोची खरी ताकद आहे. पुणे यूथ विंगला देशातील नंबर एकची विंग बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या वेळी कांतीलाल ओसवाल, पंकज कर्नावट, चेतन भंडारी यांनी देखील मार्गदर्शन केले. प्राची जैन व राहुल संचेती यांनी जेबीएन कशा प्रकारे कार्य करते, आपण आपले रेफरन्स कसे वाढवावे. इतरांना व स्वत:ला जेबीएनमधून कसा व्यवसाय करून घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. जितो यूथविंगचे गौरव नहार, प्रीतेश मुनोत, निलेश दर्डा, संवेद सोलंकी, समता ओसवाल, भूषण कोटेचा, गौरव भाटीया, अंकित जैन, अंकित शोण्ड, हर्षल बाफना, हर्षल शहा, सिद्धांत संघवी, साक्षी संचेती, मोनिका ओसवाल, किशोर ओसवाल, संदीप लुणावत उपस्थित होते. नवकार महामंत्राचे पठण करून या पहिल्या जेबीएन मिटिंगची सुरुवात केली.
फोटो ओळ : जितो यूथ विंगच्या पहिल्या जेबीएन मिटिंगला उपस्थित जितोचे पदाधिकारी.