शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर महिलेची झेप! गल्लीतील ‘डब्बा दीदी’ झाली जी-२० च्या समितीची अध्यक्षा

By राजू इनामदार | Updated: June 13, 2025 18:56 IST

पुण्यात राहणाऱ्या रोनिता आता जगातील अनेक देशांचा समावेश असलेल्या या जागतिक परिषदेत दक्षिण आफ्रिका सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत

पुणे : कोरोनाकाळात त्या बाणेरमधील त्यांच्या घरातून ससूनमध्ये दररोज खिचडीचे ५०० पेक्षा जास्त डबे पोहोचवित होत्या. त्याआधी त्यांनी केनिया या देशात ‘सोशल बिझनेस’ ही कल्पना राबवून अनेक गरीब कुटुंबे व महिलांना रोजगार मिळवून दिला. त्यांच्या याच कामाची दखल दक्षिण आफ्रिका सरकारने घेतली व त्यांना नोव्हेंबर २०२५ मध्ये तिथे होणाऱ्या जी-२० या जगातील १९ देश व युरोपियन युनियन यांच्या परिषदेच्या युवा विभागाचे अध्यक्षपद दिले आहे.

त्यांचे नाव आहे रोनिता रॉय-घोष. दक्षिण आफ्रिका सरकारचा तुमची जी-२० ती युवा २० परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संमती मागणारा मेल येताच, त्या भारावून गेल्या. तिथे केलेल्या कामाची अशी दखल घेतली जाईल याची कल्पनाही त्यांना नव्हती. पुण्यात राहणाऱ्या रोनिता आता जगातील अनेक देशांचा समावेश असलेल्या या जागतिक परिषदेत दक्षिण आफ्रिका सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठीचे त्यांचे काम आतापासून सुरूही झाले आहे.

प्रयागराज (अलाहाबाद) मधील घोष कुटुंबात जन्म झालेल्या रोनिता खऱ्या अर्थाने विश्वकन्या आहेत. अलाबाहाद, दिल्ली, केनिया, तिथून महाराष्ट्र व महाराष्ट्रातून मग पुण्यात असा त्यांचा प्रवास आहे. याशिवाय कामानिमित्ताने त्यांनी जगातील अनेक देशांचा प्रवास केला आहे तो वेगळाच. सध्या त्या वर्ल्ड चेंबर फॉर सोशल बिझनेस या जागतिक स्तरावरील संस्थेच्या अध्यक्ष आहेत. हे काम करतानाच त्या ‘एकत्र’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीही वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत.

केनियामध्ये त्यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. तिथे त्यांनी ‘सोशल बिझनेस’ नावाची एक संकल्पना गरीब कुटुंबासाठी राबवली व त्यांना आर्थिकदृष्ट्या उन्नत केले. दक्षिण आफ्रिका सरकार त्यांच्या या कामाने प्रभावित झाले. तिथे नोव्हेंबरमध्ये जी-२० परिषद होत आहे. या परिषदेचा युवा विभाग असतो. या विभागाचे अध्यक्षपद यजमान देशाकडे असते. दक्षिण आफ्रिका सरकारने यासाठी रोनिता यांची निवड केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेकविध सामाजिक विषयांमध्ये रोनिता यांचे योगदान आहे. त्यासंबंधीच्या संस्थांवर त्या सक्रिय असतात. उपाय सुचविण्याबरोबरच ते राबविण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

कोरोनाच्या आधी रोनिता काही कारणाने पुण्यात आल्या होत्या. कोरोना सुरू झाला व त्या इथेच अडकून पडल्या.शांत न राहता त्याकाळात त्या ससूनमधील वैद्यकीय कर्मचारी तसेच कोरोना रुग्ण यांना खिचडीचे डबे पोहचवू लागल्या. त्यावरूनच त्यांना ‘डब्बा दीदी‘ हे नाव पडले. या कामासाठी त्यांनी जिकोनी फौंडेशनची स्थापना केली. ११ लाखांहून अधिक गरजूंना त्यांनी या काळात जेवण दिले. आता त्या पक्क्या पुणेकर झाल्या आहेत. इथून आता कुठेच जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेG20 Summitजी-२० शिखर परिषदSouth Africaद. आफ्रिकाWomenमहिलाBanerबाणेरIndiaभारत