पुणे वन्यजीव विभाग फेसबुकवर

By Admin | Updated: March 21, 2016 00:39 IST2016-03-21T00:39:00+5:302016-03-21T00:39:00+5:30

सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या माध्यमातून संवाद, सुख-दु:ख, भावनांची देवाण-घेवाण वाढली आहे

Pune Wildlife Department on Facebook | पुणे वन्यजीव विभाग फेसबुकवर

पुणे वन्यजीव विभाग फेसबुकवर

बारामती/घोडेगाव : सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या माध्यमातून संवाद, सुख-दु:ख, भावनांची देवाण-घेवाण वाढली आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. प्रभावी माध्यम म्हणून या मीडियाची ओळख होत आहे. आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आता पुणे वन्यजीव विभागाने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. हा विभाग आता फेसबुकशी जोडला जाणार आहे. त्यासाठी या विभागाचे स्वतंत्र फेसबुक अकाऊंट उघडले जाणार आहे. वनविभागाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली. २१ मार्च जागतिक वन दिनाचे औचित्य साधून www.facebook.com/punewildlifedivision  या फेसबुक पेजचे तर भीमाशंकर व सुपे अभयारण्याचे , उद्घाटन केले जाणार आहे.

 

Web Title: Pune Wildlife Department on Facebook