शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 22:15 IST

Pune Crime News: ४४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा फोन केला. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुर्केगाव परिसरात ही घटना घडली. भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले. 

- किरण शिंदे४४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून केला. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुर्केगाव परिसरात ही घटना घडली. भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले. 

लक्ष्मीबाई बाबा जाधवराव (वय ४४, बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती बाबा जाधवराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्केगावात जाधव कुटुंबीय राहण्यासाठी आहे.  आरोपी बाबाराव जाधव यांना दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन ते पत्नीशी वाद घालत होते. दरम्यान, लक्ष्मीबाई या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. तर, बाबाराव जाधव हा वेल्डींगची कामे करत होता. दरम्यान बाबाराव हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्या सतत भांडण व्हायचे. सोमवारी मध्यरात्री देखील याच कारणावरून भांडण झाले. मध्यरात्री बाबा हा दारू पिऊन आला होता. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ते एकत्र झोपलेही. दरम्यान, मध्यरात्री बाबा याने  पत्नी लक्ष्मीबाई यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला.

पत्नीचा खून केल्यानंतर बाबा तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी आई फोन उचलत नसल्याने त्यांची मुलगी घरी आली. घराचा दरवाजा बंद असल्याने दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता लक्ष्मीबाई या रक्ताच्या चारोळ्या पडल्याचे दिसून आले. तर शेजारीच बाबाराव जाधव झोपला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोणीकंद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी बाबाराव याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे