शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Pune Weather Upadte : शिवाजीनगरचा पारा १० अंशाच्या खाली; बारामतीकरही गारठले

By श्रीकिशन काळे | Updated: November 29, 2024 19:49 IST

पुणे : शहरातील थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढत असल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडत आहेत. शुक्रवारी (दि. २९) शिवाजीनगरचे किमान तापमान १० ...

पुणे : शहरातील थंडीची तीव्रता अधिकाधिक वाढत असल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडत आहेत. शुक्रवारी (दि. २९) शिवाजीनगरचे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले आहे. तसेच हवेलीत ८.४, दौंड ९.१, बारामतीत ९.५ तापमानाची नोंद झाली. या हंगामात पहिल्यांदाच शिवाजीनगरचे तापमान एवढे घसरले आहे. यंदा महाबळेश्वरपेक्षाही पुणे थंड बनले आहे. कारण महाबळेश्वरमध्ये १० अंशाच्या खाली अजून तरी तापमान आलेले नाही. पुण्यात मात्र गेल्या आठवड्यापासून पारा घसरला आहे. तसेच राज्यात अहिल्यानगरमध्ये देखील किमान तापमान कमी नोंदवले जात आहे.नैरत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीचे रूपांतर ‘फेंगल’ चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे चक्रीवादळ शनिवारी (दि. ३०) दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून जेऊर येथे शुक्रवारी हंगामातील निचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडू आणि रायलसिमा भागात काही ठिकाणी शनिवारी (दि. ३०) अतिजोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज दिला. उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कायम असून, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान देखील ३० अंशाच्या खाली आले आहे.पुणे शहरातील किमान तापमानहवेली : ८.४दौंड : ९.१बारामती : ९.५शिवाजीनगर : ९.५एनडीए : १०हडपसर : १२.१कोरेगाव पार्क : १४.४वडगावशेरी : १५.९मगरपट्टा : १६.४लोणावळा : १७.७बारामतीकर गारठले !बारामती, दौंड भागामध्ये या हंगामातील सर्वात थंड दिवस शुक्रवार (दि. ३०) ठरला. कारण किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले. कमालीच्या थंडीने बारामतीकर चांगलेच गारठले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान