शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water News : कालवा समितीच नसल्याने शहराच्या पाण्याबाबतचा निर्णय लांबला

By नितीन चौधरी | Updated: November 27, 2024 19:53 IST

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवले ...

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी शहरासाठी किती पाणी राखीव ठेवले जाईल, याबाबत अद्याप जलसंपदा विभागाकडून निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शहरासाठी पाणी सोडताना खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांमधून तसेच काही प्रमाणात भामा आसखेड धरणातूनही पुण्यासाठी पाणी उचलण्यात येते. महापालिकेच्या नियोजनानुसार शहराला २१ टीएमसी इतक्या पाण्याची गरज असते. यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणामध्ये सप्टेंबरमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तसेच जिल्ह्यातील अन्य धरणेही फुल्ल झाली होती. खडकवासला प्रकल्पात सध्या २७.२७ टीएमसी (९३.५५ टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाण्याच्या टंचाईची स्थिती नाही.खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी १५ ऑक्टोबरला नियोजन करण्यात येते. त्यात शहरासह जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या निर्णयासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येते. मात्र, निवडणुकीमुळे ही बैठक होऊ शकली नाही. ही बैठक घेण्यासाठी जलसंपदा विभागाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांशी पत्र व्यवहार केला आहे. मात्र, त्याबाबत सरकारकडून कोणतीही भूमिका अद्याप घेण्यात आली नसल्याचे समजते. पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असते. या बैठकीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. त्या बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याचा फैसला करण्यात येतो. आता राज्यात महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाचे सरकार स्थापन होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाप्रमाणे जलसंपदा विभागाला आहे. त्यामुळे जोपर्यंत ही बैठक होणार नाही तोपर्यंत पाणीवाटपाबाबतचे निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे.शहराची वाढती लोकसंख्या, समाविष्ट गावे यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळेच महापालिकेकडून गेल्या दोन वर्षांपासून पाण्याचा वाढीव कोटा देण्याची मागणी जलसंपदा विभागासह राज्य सरकारकडे करीत आहेत. महापालिकेने तर २१ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात महापालिकेचा जलसंपदा विभागाशी झालेल्या करारापोटी ११.६० टीएमसी इतके पाणी देय ठरले होते. परंतु, धरणातून अतिरिक्त पाणी उचलले जात असल्याने १४.६१ टीएमसी पाणीसाठा जलसंपदा विभागाने मंजूर केला होता. महापालिकेने ७६ लाख लोकसंख्या दाखवून त्यासाठी २१ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला दिला आहे. अद्याप त्याला जलसंपदाने मंजुरी दिली नाही. मात्र, राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच त्याचा निर्णय होईल, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रkhadakwasala-acखडकवासला