शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

 भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 19:01 IST

कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

पुणे :आणीक काही इच्छा, आम्हा नाही चाड तुझे नाम गोड, पांडुरंग 

कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले बघायला मिळाले.          संपूर्ण सिंहगड रस्ता यामुळे गर्दीने फुलून गेला होता. यावेळी वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची तारांबळ उडालेली बघायला मिळाली. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावून भाविक दर्शनासाठी जात होते. यामध्ये आबालवृद्धांसह तरुणांचाही समावेश होता. शहरात सहसा न मिळणाऱ्या गोडीशेवेची दुकानेही दिसत होती.याशिवाय लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकाने, स्त्रियांसह सौंदर्य प्रसाधनांची दुकानेही दुतर्फ़ा थाटण्यात आली होती.          दुपारपेक्षा संध्याकाळी गर्दीत वाढ होताना दिसून आली. कार्यालयीन वेळ संपल्यावर अनेकांनी दर्शन घेणे पसंत केले. गर्दीमुळे दर्शनाची रांग विठ्ठलवाडी कमानीच्या बाहेरपर्यंत आली होती. दर्शन रांगेतही विठ्ठलाची भजने, अभंग गायले जात होते. मंदिर परिसरात अनेक स्वयंसेवी संस्थांतर्फे साबुदाण्याची खिचडी, राजगिरी लाडू, भारतीय वृक्षांच्या रोपट्याचे वाटप करण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. ध्वनिक्षेपकावरून हरवलेल्या आणि गवसलेल्या वस्तूंची माहिती दिली जात होती. चुकलेल्या लहान मुलांचीही नावेही जाहीर करण्यात येत होती.  

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस