शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video : क्षणात जीव वाचला..! पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 12:46 IST

पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला.

ओतूर (जुन्नर)  -  माळशेज परिसरातील सागनोरे येथे काळू धबधब्याजवळ एक गंभीर घटना घडली. पुण्याहून चार पर्यटकांना घेऊन आलेला ड्रायव्हर काळू नदीत पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला. नदीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे तो वाहू लागला. मात्र, प्रसंगावधान राखून त्याने नदीतील दगडाचा आधार घेत थांबण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून जवळच १०० ते १५० फूट अंतरावर असलेले स्थानिक व्यावसायिक तुषार मेमाणे, संदीप साबळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी स्कार्फ आणि शाली एकत्र करून दोरीसारख्या बांधल्या आणि त्या ड्रायव्हरकडे फेकून त्याला बाहेर ओढले. त्यांच्या या धाडसामुळे ड्रायव्हरचा जीव वाचला.दरम्यान, निसर्गरम्य जुन्नर तालुक्यात पावसाळी पर्यटनाला सुुरुवात झाली असून, धबधबे, रानवाटा, हिरवीगार डोंगरदऱ्या आणि ऐतिहासिक स्थळांकडे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, अनिल तांबे, विनायक तांबे, संभाजी तांबे, तुषार थोरात, धनंजय डुंबरे, रंगनाथ पा. घोलप, तानाजी तांबे, विशाल तांबे, भगवान घोलप, सुदाम घोलप, अनिल डुंबरे आदींनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड