शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : मांत्रिकाच्या मदतीनं महिलेवर उपचार प्रकरण, डॉ. सतीश चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 08:47 IST

मांत्रिकाच्या मदतीने महिलेवर उपचार करणा-या डॉ. सतीश चव्हाणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : मांत्रिकाच्या मदतीने महिलेवर उपचार करणा-या डॉ. सतीश चव्हाणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील हा धक्कादायक प्रकार होता. अलंकार पोलिसात डॉ. सतीश चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या महिलेवर उपचार करण्यासाठी डॉक्टरनेच मांत्रिक बोलावल्याची धक्कादायक घटना येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडली. संबंधित महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनीच एका व्हिडीओद्वारे हा प्रकार समोर आणला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत होता. या प्रकाराबद्दल रात्री उशिरा डॉ. सतीश चव्हाण आणि उपचारासाठी बोलावलेल्या मांत्रिकावर अंधश्रद्धाविरोधी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संध्या सोनवणे (वय 24 वर्ष) यांच्यावर स्वारगेट येथील डॉ. सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये स्तनाच्या गाठीवर उपचार सुरू होते. त्यांना 20 फेब्रुवारीला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे डॉ. चव्हाणसुद्धा तपासणीसाठी येत असत. संध्या यांची तब्येत बिघडत चालल्याने डॉ. चव्हाण यांनी मांत्रिकाला बोलावून त्याच्यामार्फत उताराही केला.

हा सर्व प्रकार संध्या यांच्या नातेवाइकांनी कॅमे-यात चित्रित केला. संध्या यांचे बंधू महेश जगताप यांनी सांगितले की, डॉ. चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मांत्रिकाला बोलावले़ त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला. जगताप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॉक्टरांकडून पोलीस संरक्षणाची मागणीधमकीचे फोन येत असल्याचे सांगून डॉ़ चव्हाण यांनी पोलिसांकडे सरंक्षणाची मागणी केली आहे. मात्र, आपण संध्या यांना तपासत असताना एक पुजारी हजर होता, असे त्यांनी कबूल केले. ‘व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वा मंत्र-तंत्राचा प्रकार आढळला नाही. हॉस्पिटलमध्ये मांत्रिकाला प्रवेश दिला जात नाही. नातेवाईक म्हणून रुग्णाला भेटायला कुणीही जाऊ शकतो. - डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ हॉस्पिटल

 

टॅग्स :Puneपुणे