शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका; आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 14:01 IST

विद्यापीठातील आपल्या सहकाऱ्यांना कोरोनामुळे गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण....

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ७ कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. तसेच अनेक कर्मचारी सध्या कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात व घरी उपचार घेत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून विद्यापीठ कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना विद्यापीठातील प्रवेश बंद केला. शासन नियमाप्रमाणे अत्यावश्यक विभाग वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यापीठातील सेवकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यात प्राधान्याने विद्यापीठ कर्मचाऱ्यांना व त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, लसींचा आवश्यक साठा उपलब्ध होत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांना लस देणे अद्याप शक्य झाले नाही.

विद्यापीठातील समीर नेवकर (वित्त विभाग), विश्वास आव्हाड (भूगोल विभाग), गजेंद्र तारडे (परीक्षा विभाग), शंकर भालेराव (परीक्षा विभाग), संजय गायकवाड (परीक्षा विभाग), प्रभाकर शिरसे (स्थावर विभाग), अशोक भोसले (मध्यवर्ती कार्यशाळा विभाग) या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.विद्यापीठातील आपले सहकारी कोरोनामुळे दगावले. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विद्यापीठातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु ,अनेक कर्मचारी उपचार घेऊन घरी परतले आहेत. परंतु यापुढील काळात कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी  विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाबत आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यात एका प्रोग्रॅमरचा समावेश आहे. या प्रोग्रॅमरकडे निकाल तयार करण्याचे काम होते. त्यामुळे आता इतर कर्मचाऱ्यांवर या कामाची जबाबदारी येऊन पडणार आहे. विद्यापीठातील ७ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेल्याने विद्यापीठातील कर्मचारी संघटनांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.-------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPune universityपुणे विद्यापीठ