शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ट्रेलरने ८ वाहनांना उडविले, दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 21:47 IST

Accident : आठ वाहनांना उडविल्यानंतर नवले पुलाच्याजवळ या ट्रेलरला आग लागली होती.

ठळक मुद्देअपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर सहा किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी, २ दुचाकी व एक रिक्षा अशा ८ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. आठ वाहनांना उडविल्यानंतर नवले पुलाच्याजवळ या ट्रेलरला आग लागली होती.

या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे( वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे ( वय ३२, रा. उस्मानाबाद) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी जखमी असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास २२ चाकी ट्रेलर सातारा बाजूकडून ४१ टन लोखंड घेऊन मुंबई बाजूकडे जात होता. भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे चाललेल्या ८ वाहनांना एका पाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. तसेच त्यानंतर ट्रेलरची पुलावरील कठड्याला धडक बसल्याने ट्रेलर ने पेट घेतला.

याबाबतची माहिती मिळताच पीएमआरडी व पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रेलरने धडक दिल्याने रिक्षाचालक बाहेर पडले. तेव्हा बाजूने जाणाऱ्या वाहनांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अनेक जण अडकून पडले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलर चालक प्रेमराज बिष्णोई ( वय २५, रा. जोधपूर, राजस्थान) याला नागरिकांनी पकडून जोरदार मारहाण केली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची खबर मिळताच घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस व सिंहगड वाहतूक विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचून मदत कार्य केले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर सहा किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.

अपघातांची मालिका सुरूच; राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्षकात्रज नवीन महामार्गावरील या भागात नेहमी अपघात होत असतात. तरीही येथील तीव्र उतार कमी करण्याबाबत महामार्ग प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मुळात या ठिकाणी महामार्ग बांधणीमध्येच दोष असल्याने सांगितले जाते. परंतु तरीही त्यात सुधारणा केली जात नाही. गेल्या बुधवारी पहाटे अशाच पद्धतीने याच ठिकाणी एका ट्रकने ८ वाहनांना धडक दिली होती. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. दुसर्या ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला क्रेन मागवून वाहने बाजूला करुन बाहेर काढावे लागले होते. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात