शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द, अपघातांचे ४२ ब्लॅक स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 22:30 IST

वाहतूक नियम मोडणाऱ्या आतापर्यंत सुमारे तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे : जिल्ह्यात वर्षभरात ९०० पेक्षा अधिक अपघाती मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ब्लॅक स्पॉटचे सखोल सर्वेक्षण करून तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, ४२ ब्लॅक स्पॉट होते, त्यातील १५ ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, अनधिकृत होर्डिंग हटविणे यासह घाट मार्गांवर लेन ओलांडण्यास प्रतिबंध घालण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वाहतूक नियम मोडणाऱ्या आतापर्यंत सुमारे तीन हजार वाहनधारकांचे परवाने रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहुल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण पूर्ण केले असून ४२ ब्लॅक स्पॉट होते त्यातील १५ ब्लॅक स्पॉट काढण्याचे काम सुरू आहे. उर्वरित ब्लॅक स्पॉट काढण्याची संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. हिंजेवाडी व चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्याचेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्ह्यातील एमएसआरडीसी, एनएचआय व सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील अनधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करावी. संबंधितांना २१ दिवसांची नोटीस देऊन त्यानंतर उर्वरित होर्डिंग काढून टाकावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शक्यतोवर मुख्य रस्त्यावर गतिरोधक उभारू नयेत, धोकादायक जंक्शन असल्यास अप्रोच/दुय्यम रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेस प्रमाणे गतिरोधक व चिन्हांकन करावे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या धर्तीवर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे स्मूथ गतिरोधक असावेत. सोमवारी पाहणीनवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी समितीमार्फत आयआयटी दिल्लीचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यानुसार आयआयटीचे पथक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस विभाग, महानगरपालिकांचे अधिकारी मिळून सोमवारी (दि. १६) भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहन डुडी यांनी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Licenses Revoked, Black Spots Identified to Reduce Accidents in Pune District

Web Summary : Pune district revokes 3,000 licenses for traffic violations, addresses 42 accident black spots, aiming to reduce fatalities. Improvements are underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीPuneपुणे