शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पाेलीसांनी दिले अनेकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:56 IST

पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात करण्यात अाले 22 ग्रीन काॅरिडाॅरकमी वेळेत अवयव पाेहचविण्यात येताे रुग्णालयात

पुणे  : पुण्याच्या वाढत्या वाहनसंख्येला शिस्त लावत असताना पुण्याच्या वाहतूक पाेलिसांनी अनेकांना जीवनदान दिले अाहे. गेल्या वर्षभरात भारतातील विविध भागातून प्रत्याराेपनासाठी अाणण्यात येणाऱ्या अवयवांसाठी पुणे वाहतूक पाेलिसांनी 22 ग्रीन काॅरिडाॅर तयार करुन या अवयव घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला रस्ता तयार करुन दिला अाहे.     पुण्यात अनेक माेठी हाॅस्पिटल्स अाहेत. अवयव प्रत्याराेपनाची चळवळ पुण्यात राबविण्यात येत अाहे. त्यामुळे अनेक रुग्ण पुण्यात उपचारासाठी येत असतात. काही नातेवाईक अापली प्रिय व्यक्ती या जगातून निघून गेल्यावर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतात. ताे अवयव एखाद्या गरजू रुग्णाला उपयाेगी पडू शकताे. अशावेळी ताे अवयव याेग्य वेळेत रुग्णालयापर्यंत पाेहचणे गरजेचे असते. अनेकदा पुणे विमानतळावर हे अवयव येत असतात. किंवा पुण्या जवळील एखाद्या रुग्णालयातून येत असल्यास रस्त्याच्या मार्गाने येत असतात. अशावेळी विमानतळ ते रुग्णालय तसेच पुणे अायुक्तालयाची हद्द ते ठराविक रुग्णालयापर्यंत अॅम्बुलन्सला पाेलिसांकडून वाट माेकळी करुन दिली जाते. तसेच कमीत कमी वेळेत अवयव रुग्णालयात पाेहचेल याची खबरदारी घेतली जाते. याला ग्रीन काॅरिडाॅर असे म्हंटले जाते. पुणे वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात असे 22 ग्रीन काॅरिडाॅर केले अाहेत. यामुळे प्रत्याराेपण करण्यात येणारे अवयव लवकरात लवकर रुग्णालयात पाेहचण्यास मदत झाली अाहे. 17 जानेवारी राेजी केलेल्या ग्रीन काॅरिडाेअरमध्ये मुंबईच्या काेकीलाबेन रुग्णालयातून पुण्यातील रुबी हाॅल क्लिनकपर्यंत अाणण्यात अाले. त्यात पुणे अायुक्तलयाची हद्द जेथून सुरु हाेते अश्या किवळे फाटा ते रुबी हाॅल अश्या 28 किलाेमीटरचे अंतर अवघ्या 19 मिनिटांमध्ये पार करुन अवयव सुखरुप रुग्णालयाता पाेहचविण्यात यश अाले हाेते.     असेच ग्रीन काॅरिडाॅर सातत्याने करण्यात येत असून, या माध्यमातून अनेकांना एक नवीन जीवन मिळत अाहे. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दान