शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Traffic : वाहतूक कोंडीतून सुटका होणार..! हिंजवडीतून थेट मुंबईसाठी शिवनेरी धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:18 IST

- शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हिंजवडी येथूनच थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुणे :पुणे-मुंबई दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, पुण्यात प्रवेश केल्यानंतर स्वारगेट किंवा पुणे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हिंजवडी येथूनच थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने पाठवला आहे.सध्या पुण्यातून दादर, बोरिवली आणि ठाण्यासाठी ई-शिवनेरी व ई-शिवाई या वातानुकूलित ई-बस सेवा सुरू आहेत. स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून दिवसाला सुमारे १२४ फेऱ्या होत असून, तेवढ्याच फेऱ्या मुंबईहून पुण्याकडे येतात. मात्र, एक्स्प्रेस-वे आणि शहरातील वाहतूक कोंडीमुळे या बस अनेकदा नियोजित वेळेपेक्षा एक ते दीड तास उशिराने पोहोचतात. विशेषतः वाकड चौकापासून स्वारगेट व पुणे स्टेशनपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी प्रवासी व प्रवासी संघटनांकडून हिंजवडी येथूनच एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाने हिंजवडी परिसरातून थेट मुंबईसाठी एसटी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.हिंजवडी एसटी सेवेचे फायदे :पुणे शहरातील वाहतूक कोंडीत होणारा विलंब टळणारपुणे-मुंबई प्रवासाचा किमान एक तास वेळ वाचणारई-बससाठी हिंजवडीतच चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताववाहतूक कोंडीत वाचलेल्या वेळेत बस चार्जिंग शक्यभविष्यात बस फेऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यतामेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीपर्यंत पोहोचणे अधिक सोपेमेट्रोमुळे हिंजवडी एसटी सेवेचा फायदा होणार 

 हिंजवडीतून मुंबईसाठी एसटी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत एसटी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. - अरुण सिया, विभाग नियंत्रक  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Mumbai commuters may soon get direct bus service from Hinjewadi.

Web Summary : To ease traffic woes, a proposal suggests direct bus service from Hinjewadi to Mumbai. This will save time and connect with the upcoming metro line, benefiting commuters.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMumbaiमुंबईpassengerप्रवासीTrafficवाहतूक कोंडी