शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाहतूक अडविली; तरुण मनसे कार्यकर्त्यांवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 09:20 IST

Raj Thackeray Pune: राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी  विविध भागातील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. 

पुणेकर तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधीच पुण्यात वाहतूक कोंडीने वैताग आणलेला आहे. कित्येक वर्षे झाली आधी ओव्हरब्रिज बांधण्यासाठी रस्ते व्यापलेले, वाहतूक कोंडी आता ते ओव्हरब्रिज तोडून तिथे मेट्रोच पूल बांधण्यासाठी वाहतूक कोंडी असाच प्रकार सुरु आहे. यातच पुण्यातील लोकांचे निम्मा दिवस जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुराच्या समस्येमुळेही पुणेकर वैतागलेले आहेत. त्यातच राज ठाकरे पुण्यात आल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कार चालक तरुण चांगलाच भडकला होता. 

राज ठाकरे आल्याने तिथे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी हा तरुण तिथून जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्याची कार बराच वेळ थांबविली. अखेर वैतागलेल्या तरुणाने कारच्या बाहेर येत मनसे कार्यकर्त्यांवर धावून जात या लोकांसाठी आमचा रस्ता का अडवला असा जाब विचारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

राज ठाकरेंचा पुणे दौरा...राज यांनी प्रशासनावर टीका केली.  महानगरपालिका, प्रशासन, जलसंपदा विभाग आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. जगभरात पाणी सोडणार असल्यास ते अलार्म सिस्टिमद्वारे कळवतात. मग आपल्याकडे काही घोषणा अथवा सूचना देऊन का कळवले नाही असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.  सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगरी राज ठाकरे भेट दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेTrafficवाहतूक कोंडी