शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Pune: पिंपळसूटी येथे बांधाऱ्यावरून ट्रकटर घोड नदीत कोळसळा, अल्पवयीना मुलाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 22:43 IST

Pune Accident News: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे ट्रकटर बंधाऱ्यावरून घोड नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून, चालक बचावला आहे.

शिरूर  - तालुक्यातील पिंपळसूटी   येथे ट्रकटर बंधाऱ्यावरून घोड नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात अल्पवयीन् मुलाचा मृत्यू झाला असून चालक बचावला आहे.शुभम राजू धायगुडे (वय 14,रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ. नगर) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर चालक मृत मुलाचे चुलते धायगुडे साहेबराव धायगुडे (40, रा.हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ. नगर ) हे या अपघातात बचावले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज शनिवारी (दि. 4) दुपारी 12 वाजेच्या दरम्यान भानुदास धायगुडे हे ट्रकटर घेऊन हंगेवाडी येथून पिंपळसुटी कडे येत होते. ट्रकटर मध्ये त्यांचा वर त्यांचा पुतण्या शुभम हा बसला होता. ट्रकटर येथील घोड नदीवरील अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकटर  दुथडी भरून वाहत असलेल्या घोड नदीत कोसळला. पाण्याचा वेग जास्त असल्याने जखमी भानुदस् घायगुडे हे काही अंतरावर पोहून बाहेर निघाले. मात्र शुभम हा ट्रकटर च्या मड गार्ड मध्ये अडकून ट्रकटर बरोबर नदी तळाला गेला होता. घटनेची माहिती मिळताच पिपंळसूटी, शिरसगाव, हंगेवाडी, कोळपे मळा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक नदीकिनाऱ्याने शुभम याला शोधत होते. तर काही नागरिक व लोक प्रतिनिधी यांनी घोडधरण पाटबंधारे विभागाकडे विनंती करत काही काळ धरणातून सोडण्यात येणारे पाणी  बंद करण्याची विनंती केली. तीन  तासांनी पाणी बंद होताच क्रेनच्या सहाय्याने ट्रकटर बाहेर काढण्यात आला यावेळी ट्रकटर मध्ये अडकलेला शुभमचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस स्टेशनला आक्स्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अरुंद बांधाऱ्याने घेतला जीवपिंपळसूटी ते हंगेवाडी दरम्यान अनेक वर्षनपासून पुलाची मागणी होत आहे. या भागात  पुणे व अहिल्यानगर जिल्हाला जोडणारा येथे केवळ अरुंद कोल्हापूर पद्धतीचा बांधरा आहे. येथे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्यानेच या मुलाचा जीव घेतल्याचे नागरीक बोलत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Tractor plunges into river, teen dies at Pimpalsooti.

Web Summary : A 14-year-old boy died after a tractor fell into the Ghod River at Pimpalsooti. The driver survived. The accident occurred due to the narrow bridge, prompting calls for a new bridge construction.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात