शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर अपघात, १६० प्रवाशांसह दिल्लीला चाललेल्या विमानाला 'पुश बॅक टग' धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:25 IST

दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली....

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या एका विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानाला 'पुश बॅक टग' म्हणजेच विमान उडणे किंवा ढकलण्याची वाहन धडकले. या घटनेमध्ये विमानाचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर विमानाच्या खालच्या बाजूस 'फ्युजलाज'मध्ये मोठे भगदाड पडले होते. तसेच विमानाच्या पंख्यांच्या पत्र्याचे देखील नुकसान झाले. या अपघातामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. अपघातानंतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पण दिल्लीला जाणारे हे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एअर इंडिया फ्लाईट क्रमांक AI 858 गुरुवारी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी दिल्लीसाठी जाणार होते.  एरोब्रिजला जोडलेले हे विमान प्रवासी बसल्यावर बाजूला झाले. त्याचवेळी अचानक पुश बॅक टगची मोठी धडक विमानाच्या खालच्या बाजूस लागल्याने विमानाचा पत्रा कापला गेला आणि मोठे भगदाड पडले. हवाई उड्डाण मंत्रालयाच्या विभागातर्फे या घटनेची चौकशी केली जाणार आहे. तसेच चौकशीनंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

या विमानांमध्ये एकूण १६० प्रवासी होते. ते सर्वजण दिल्लीला निघाले होते विमानाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज विमानतळ परिसरात झाला. त्यानंतर वैमानिकांनी आणि तांत्रिक टीमने विमानाचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना विमानाच्या पंखांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले. याच पंखांमध्ये इंधन असते सुदैवाने कोणताही मोठा अवघात न होता सर्वजण सुखरूप बचावले आहेत तसेच विमानाचेही थोडेफार नुकसान झाले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPuneपुणेpune airportपुणे विमानतळ