शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

पुणे: पतीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागून आत्महत्या, महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 12:50 IST

एका महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सेनापती बापट रस्ता येथे घडली.

पुणे, दि. 10 - एका महिलेने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सेनापती बापट रस्ता येथे घडली. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.अश्विनी सुनील लोणकर (वय 32 सध्या रा. कसबा पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी यांचे पतीबरोबर पटत नव्हते. त्यांच्याबरोबर सातत्याने भांडणे व्हायची. त्यांचे पती हे हडपसर भागात राहातात. पतीला सोडून त्या कसबा पेठेत माहेरी राहात होत्या. काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या. शनिवारी पावणेसहाच्या सुमारास त्या सेनापती बापट रस्त्यावरील साई कँपिटल इमारतीत गेल्या. इमारतीत जाण्यापूर्वी त्यांनी रखवालदाराकडे असलेल्या वहीत नोंद केली.डॉक्टरांची भेट घ्यायची आहे अशी नोंद त्यांनी वहीत केली होती. काही वेळानंतर त्यांनी साई कँपिटल इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.इमारतीच्या आवारात महिला पडल्याचे पाहून नागरिकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरेयांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्विनी यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या मरण पावल्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भावाच्या मोबाईलवरून संपर्क साधला होता.पोलिसांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला. तेव्हा कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चतु:श्रृंगी पोलिसांकडून रात्री उशीरा अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे