शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : विद्यार्थ्यांचे जेवणच केले बंद, समाजकल्याण वसतिगृह : ठेकेदारांचा असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:52 IST

समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.

पुणे : समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.पुणे विभागातील ६० हून अधिक वसितगृहांचा ठेका एका कंपनीकडे आहे. या कंपनीकडून अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. तीन ठेकेदारांनी पाच ते सहा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवणच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चांडोली राजगुरूनगर येथील मुलींची निवासी शाळा, मुलांचे वसितगृह तसेच शिरूर येथील मुलींचे वसतिगृह, येरवडा येथील मुले व मुलींचे वसतिगृह येथील जेवण सोमवारी बंद करण्यात आले. येरवडा येथील वसतिगृहात सायंकाळी केवळ वरण-भात देण्यात आला. याबाबत माहिती देण्यास समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी असमर्थता दर्शविली.पाठपुरावा करूनही टाळाटाळ-पुरवठादार म्हणून ३० जूनपर्यंत आमच्याकडे ठेका होता. पण त्यानंतर शासनाकडून हा ठेका पूर्ववत करण्यात आलेला नाही. तेव्हापासूनची देणीही रखडली आहेत. ठेका पूर्ववत झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे जितेंद्र मगर व दत्ता कोल्हे या ठेकेदारांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी