शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केली शस्त्रास्त्रं 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 1:35 PM

सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदा शस्त्रास्त्रं जप्त केली असून आरोपीला सापळा रचून गजाआड केले आहे.

पुणे - सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदा शस्त्रास्त्रं जप्त केली असून आरोपीला सापळा रचून गजाआड केले. आरोपीकडून एक बेकायदा पिस्तुल, गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. धोंडीबा विठ्ठल ढेबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना खब-याने कर्मचारी दयानंद तेलंगे आणि दत्ता सोनवणे यांना आरोपीबाबत माहिती दिली. आरोपी ढेबे हा मुंबई-बंगळुरू महामार्गावरील प्रयेजा सिटी सोसायटीसमोर शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सापळा रचण्यात आला. 

त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे 7.65 एमएम बनावटीचे एक देशी पिस्तुल, एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा वेल्हा तालुक्यातील रहिवासी असून मुंबईतील दादर येथे हमालीचे काम करतो. त्याने ही शस्त्रे कुठून आणली याबाबत तपास सुरु आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गिरीष सोनवणे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे-पाटील, दत्ता सोनवणे, पुरुषोत्तम गुन्ला, सचिन माळवे, सुदाम वावरे, श्रीकांत दगडे, राहुल शेडगे, दाहुल शिंदे, वामन जाधव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crimeगुन्हा