शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात “बहुत हुई महंगाई की मार” असे आश्वासन देणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 14:59 IST

आधीच कोरोना त्यात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले

ठळक मुद्देपुण्यात ३१ मेला पेट्रोल गेले शंभरी पार, वर्षभरात २० रुपयांनी वाढ

पुणे: “बहुत हुई महंगाई की मार ......” असे आश्वासन देत केंद्रातील सरकारने २०१४ साली सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर सत्तारुढ पक्षाने आपल्या आश्वासनाचे पालन न करता गेल्या सात वर्षांत गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली. परिणामी, आधीच कोरोना त्यात वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  

त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरुड विधानसभा मतदारसंघच्या वतीने गॅस, पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींबद्दल केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोथरुड-कर्वे पुतळा येथे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता सामाजिक अंतराचे पालन केले. याप्रसंगी स्वप्निल दुधाने, नितीन कळमकर, हर्षवर्धन मानकर, ज्योतीताई सूर्यवंशी, गोविंद थरकुडे  आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यात ३१ मेला ओलांडला शंभर रुपयांचा टप्पा 

पुण्यामध्ये सोमवारी पेट्रोलच्या दरांनी शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलचे दर नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे पुणेकरांच्या खिशावरील भार वाढल्याने महागाईत आणखी वाढ होण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे पोहोचले होते. त्यानंतर सोमवारी पुण्यातील पेट्रोलचे दरांनीही शंभरीचा टप्पा गाठला. सोमवारी पुण्यात पेट्रोलचा दर १०० रुपये १५ पैसे होता, तर प्रीमियम पेट्रोलचा दर (पॉवर, स्पीड) १०३.८३ रुपये होता. डिझेल प्रतिलिटर ९०.७१ रुपयांवर गेले. वर्षभरात २० रुपयांनी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात प्रत्येकी २० रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर गेल्या वर्षी १० जूनला ८० रुपये १५ पैसे एवढा होता, तर डिझेलचा दर ६९.०७ रुपये होता. सोमवारी (३१ मे) पेट्रोलचा दर १००.१५ रुपये आणि डिझेलचा दर ९०.७१ रुपये आहे. म्हणजेच, पेट्रोल दरात २० रुपये आणि डिझेलच्या दरात २१.६४ रुपयाने वाढ झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPetrolपेट्रोलcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार