शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

इंडिया आघाडीत रहायचे की बाहेर पडायचे? आम आदमी पक्ष संभ्रमात

By राजू इनामदार | Updated: March 15, 2025 15:55 IST

देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे.

पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीत जागांवरून वाद झाल्याने आम आदमी पार्टीने (आप) काँग्रेसबरोबर फारकत घेतली. आता पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्यांना काँग्रेसबरोबरच सामना करावा लागणार आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहे. त्यामुळेच आता ‘आप’ समोर इंडिया आघाडीत रहायचे की जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांचे यासंदर्भातील मत दिल्लीतील पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अजमावून घेतले जात आहे.देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा देशस्तरावर विरोध करण्यासाठी म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. ‘आप’ नेही इंडिया आघाडीत प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी काँग्रेसपासून दुरावा ठेवला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला लांबच ठेवले. त्यामुळे त्यांच्या सत्तेला फटका बसला. काँग्रेस उमेदवारांमुळे आपचे काही उमेदवार पराभूत झाले. पंजाब विधानसभेच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. तिथे ‘आप’ सत्ताधारी आहे, तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे तिथेही ‘आप’ला काँग्रेसबरोबरच लढावे लागणार आहे.असे असेल तर इंडिया आघाडीत रहायचे कसे? असा प्रश्न आप चे वेगवेगळ्या राज्यांमधील पदाधिकारी विचारत आहेत. आप च्या केंद्रीय नेतृत्वामध्येही याची चर्चा आहे. इंडिया आघाडीत राहून काँग्रेसचे नेतृत्व मान्य करायचे की इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असा हा प्रश्न आहे. याबाबत पक्षाकडून वेगवेगळ्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना विचारणा होत आहे. त्यासाठी केंद्रातील काही पदाधिकारी राज्यांचा दौरा करत आहेत. इंडिया आघाडीबरोबर व स्वतंत्र अस्तित्व यात राजकीय फायद्यातोट्याची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की बैठका होत असल्या तरी त्या वेगळ्या कारणांसाठी होत आहेत.आप चे संघटन वाढवण्यावर आता पक्षाने भर दिला आहे. प्रामुख्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युवकांना एकत्र करून पक्षात सामावून घेण्यासंदर्भात चर्चा होत आहेत. महाराष्ट्रातील एकूण राजकीय गोंधळात दिल्लीतील नेतृत्वाला महाराष्ट्राकडून अपेक्षा आहेत. पक्ष बांधणी करण्यास बराच वेळ असल्याने त्यादृष्टिने बैठका होत आहेत असे किर्दत म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आप ने महाराष्ट्रात इंडिया आघाडीला, म्हणजेच महाविकास आघाडीला साथ दिली. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने एकही जागा न मागता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यातून विधानसभा लढवू इच्छिणारे काही कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची समजून काढण्यासाठीची दिल्लीतील काही पदाधिकारी महाराष्ट्रात येत आहेत अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल