जुन्नर - शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर गडदेवता शिवाई मातेच्या मंदिराजवळ कडे कपारीत असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी शिवनेरीवर आलेल्या शिवप्रेमी पर्यटकांना हल्ला केला यामध्ये जवळपास ६० ते ७० पर्यटकांचा मधमाशा चावल्या. या सर्व पर्यटकांना जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालय मध्ये प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शिवभक्त पर्यटक गडावर जात येत होते.दरम्यान शिवाई माता मंदिराजवळ मोहोळाच्या माशा उठल्याचे निदर्शनास आल्याने पर्यटकांची धावपळ उडाली. ही घटना सकाळी सव्वा नऊ च्या दरम्यान घडली असल्याचे रेस्क्यू टीमचे प्रमुख रुपेश जगताप,राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.
सर्व पर्यटकांनी शिवनेरी पायथ्याकडे पळन्यास सुरुवात केली. तर काही पर्यटक मात्र शिवजन्मस्थळ परिसरात अडकून राहीले. जुन्नर रेसक्यू टीम चे सदस्य व वनविभागाचे कर्मचारी यांनी पर्यटकांना सुखरूप गडावरून खाली उतरविण्यासाठी तातडीने धाव घेतली. तसेच जखमी पर्यटकांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी गडावर एका कार्यक्रमानिमित्त आलेले खासदार निलेश लंके यांनी ही मदतकार्यास सहभाग घेतला.
चौकटीसाठी मजकू र-(१)मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना ऐन उन्हाळ्यात नेहमीच घडत असतात. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर ने प्रस्थान केल्यानंतर थोड्याच वेळाने आग्या मोहोळाच्या मधमाशा चावल्याने अनेक शिवभक्त जखमी झाले होते.(२) मधमाशा असलेल्या परिसरात पर्यटकांनी केलेला गोंगाट
तसेच कॅमेऱ्याच्या उडालेल्या फ्लॅशने देखील मधमाशा विचलित होऊ शकतात.तसेच तसेच सिगारेटचा धूर , उग्र सुगंधी अत्तर याच्या वासाने देखील मधमाशा विचलित होऊन हल्ला करतात. या संदर्भात पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर काजळे यांनी केले.