शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

By नम्रता फडणीस | Updated: March 22, 2025 14:45 IST

लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुणेज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा पुरस्कार डॉ. केळकर यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे.

यंदा या पुरस्काराचे ३७ वे वर्ष आहे. बालशिवाजींची, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि या नगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा यांचा समावेश असलेले वैशिष्ट्यपूर्ण  स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर दोन लाख रूपये रोख रकमेची थैली असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विजय एल. केळकर सध्या फोरम ऑफ फेडरेशन्स, ओटावा आणि इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा एक सामाजिक उपक्रम असलेल्या जनवाणीचे अध्यक्ष आहेत . ते श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट (पुट्टापर्थी, एपी)चे 2014 पासून विश्वस्त आहेत. जानेवारी २०१० पर्यंत त्यांनी वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. २००२ ते २००४ पर्यंत ते अर्थमंत्र्यांचे सल्लागार होते. भारतातील आर्थिक सुधारणांमधील त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. यापूर्वी ते १९९८-१९९९ पर्यंत भारत सरकारचे वित्त सचिव होते. १९९९ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आय एमएफ)च्या बोर्डावर भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंकाचे कार्यकारी संचालक म्हणून नामांकन मिळाले आहे. देशासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आले आहे.

लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार वीर जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड