शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा! कोथरूडमध्ये झळकले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 00:17 IST

Pune: गुन्हेगारांना नेमका पोलिसांचा धाकच राहिला नाही का सवाल कोथरूडकारांनी केला आहे. त्यामुळे समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या वतीने कोथरूडच्या विविध भागात या प्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून बॅनर्स फ्लेक्स लागले आहेत. 

कोथरूड  - पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये रोज काही ना काही गुन्ह्यांच्या घटना कोथरूड मध्ये घडत आहेत. काही दिवसांपूर्वी खून, मारामाऱ्या, धमकावणे व सामान्य नागरिकांच्या गाड्यांच्या काचा, तोडफोड करणे अशा घटना घडल्या आहेत. अशा गुन्हेगारांना नेमका पोलिसांचा धाकच राहिला नाही का सवाल कोथरूडकारांनी केला आहे. त्यामुळे समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या वतीने कोथरूडच्या विविध भागात या प्रकरणाचा जाहीर निषेध म्हणून बॅनर्स फ्लेक्स लागले आहेत. 

पौड रोड, डीपी रोड, गुजरात कॉलनी,शास्त्रीनगर, मयूर कॉलनी, आझाद नगर,  कर्वे रस्ता, अशा अन्य ठिकाणी कोथरूडकारांनी जाहीर निषेध म्हणून बॅनर फ्लेक्स लावून निषेध व्यक्त केला आहे.  यात, कोथरूड च बीड होण्यापासून वाचवा. आमच कोथरूड अस नव्हत! 

गुन्हेगारांना अभय कोण देत ? त्यांना पैसा कोण पुरवत, पोशिंदा कोण ?पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का ?गुन्हेगारी प्रवृत्त करणाऱ्या रिल्स कोण पसरवत ? छोटे मोठे व्यावसायिकांची मुस्कट दाबी कोण करत? गुन्हेगारांना राजकीय अभय नको ? गुन्हेगारांना रस्ता अडवून, कर्कश व नियमबाह्य साउंड लावून उन्माद माजवायला पॉन्सरशिप कोण करत अश्या प्रकारे गुन्हेगारांना संघटीत होण्यास कोण प्रवृत्त करत? गुन्हेगारी वृत्तीचे लोक वर्गणीच्या नावाखाली घोळक्याने खंडणी मागतात कारवाई कोण करणार? गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचे अनधिकृत फ्लेक्स बॅनर वर चमकोगिरी वर का कारवाई होत नाही ?कोथरूड मध्ये सतत होणाऱ्या चोऱ्या, खून, हाणामाऱ्या याला जबाबदार कोण ? असा मजकूर लिहून थेट कोथरूडकारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत. दोन मंत्री पदे कोथरूड विधानसभेत आहेत.  त्यामुळे अशा घटनांना कोथरूडमध्ये आळा बसेल का अशी चिंता कोथरूडकारांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे