शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

पुणे-सातारा महामार्ग अवाढव्य होर्डिंग्जच्या विळख्यात;दुर्घटनेपूर्वी कारवाई करण्याची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:23 IST

- लोखंडी पाइप गंजलेले अन् वाकलेले; फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता : अनधिकृत अवाढव्य होर्डिंग्जच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

भोर -पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते सारोळा हद्दीतील रस्त्यालगत अनधिकृत अवाढव्य होर्डिंग्जची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे होर्डिंग्जला कोणत्याही प्रकाराची परवानगी नाही, ना हरकत दाखला नाही. स्ट्रक्चरल ऑडिट नाही. त्यांच्यावर कारवाई कधी होणार ? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

मागील वर्षी घाटकोपर मुंबई येथील दुर्घटनेनंतर प्रशासन कारवाई केली होती. मात्र, मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज वाढले असून, अनधिकृत होर्डिंग्ज कधी काढणार ? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. या भागातील रस्त्याच्या दुतर्फा अनेक कंपन्यांची मोठाली, अवाढव्य होर्डिंग्ज उभी आहेत. त्यासाठी मोठाले लोखंडी पाइप, अँगल, पत्रा, रॉडचा वापर केला आहे. त्याची नियमितपणे देखभाल अथवा दुरुस्ती केली जात नाही.

अनेक फलकांचे लोखंडी पाइप गंजले असून, वाकले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अशा धोकादायक फलकांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतेक फलक गावाच्या जवळ असून, तेथे नागरिकांची वर्दळ असल्याचे आढळते. दुर्घटना घडल्यावर अनधिकृत फलकांवर प्रशासन कारवाई करणार का?

मागील वर्षी भोर ते कापूरहोळ, भोर ते शिंदेवाडी, भोर ते वरंध घाट भोर-अंबाडे, भोर मळे, भोर-महुडे या दहा मार्गावरील अनधिकृत उभ्या केलेल्या अनधिकृत फलकांची माहिती घेत मार्गावरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणानंतर संबंधिताला नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा मोठ्या प्रमाणात फलक उभारले आहेत. यावेळी पुन्हा नोटिसा देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले. पुणे-सातारा महामार्ग कापूरहोळ भोर, भोर-महाड रस्त्यावर आणि तालुक्यात हॉटेल, जमीन खरेदी-विक्री राजकीय जाहिरातीसाठी विविध कंपन्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावलेले आहेत. यातील बहुतांशी होर्डिंग्ज बेकायदेशीर लावलेले आहेत. मात्र, याबाबत काहीच महिती प्रशासनाकडे नाही. तालुक्यात खरेदी-विक्री राजकीय जाहिरातीसाठी विविध कंपन्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावले आहेत. यावर पीएमआरडीए, बांधकाम विभाग, भौर नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीने कारवाईची मागणी होत आहे.

होर्डिंगवर कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविलेशिंदेवाडी ते सारोळा दरम्यान असलेले सर्व होर्डिंग्ज पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. येथे आकाशचिन्ह स्थापन करण्यात आला आहे. याबाबत पीएमआरडीएचे तहसीलदार कारवाई करतात. या कारवाईबाबत संपर्क साधला असता अनधिकृत होर्डिंग कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगितले.

होर्डिंग्जबाबत नियमवाहन चालकांच्या डोळ्यांवर तिरपी येईल अशा मनाई आहे. इमारतीवर २० फुटांपेक्षा अधिक उंची नसावी, स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या दाखल्याशिवाय परवानगी नाही. गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय उभारू नये. ठरावीक कालावधीनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे, फलकाचा आकार १० बाय २० पासुन २० बाय १० फुटापासून ३० बाय ४० फुटांपर्यंत नियम आहे. निऑनचे फलक रात्री दहानंतर बंद ठेवावेत.

दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीया परिसरातील फलकांची नियमितपणे देखभाल अथया दुरुस्ती केली जात नाही. अनेक फलकांचे लोखंडी पाइप गंजले असून, वाकले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अशा फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भोर- कापूरव्होळ रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठे अनधिकृत होडिंग लावले आहे. अनेक होर्डिंग धोकादायक असून, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला न घेता लावले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. - सायली महेंद्र साळुंके, सरपंच संगमनेर-माळवाडी 

टॅग्स :Puneपुणेcivic issueनागरी समस्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड