शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनाच्या मृत्युचा पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य तपास करावा, सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:01 IST

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन दर्शनाच्या मृत्युची बातमी खेदजनक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

पुणे - वेल्हे तालुक्यातील राजगड पायथा येथे सतीचा माळावर एका २६ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मुत्यु झाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. आत्महत्या कि घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत. किल्ले राजगड पायथा येथील सतीचा माळ येथे एका अज्ञान तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने वेल्हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. तिच्या बाजुला पांढ-या रंगाचे बुट, गुलाबी कव्हर असलेला मोबाईल, काळ्या रंगाचा गॅागल, काळ्या रंगाची बॅग, काळ्या निळ्या रंगाचे जर्कींग पडलेले सापडले. याप्रकरणी, पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन दर्शनाच्या मृत्युची बातमी खेदजनक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापुर्वी हि घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. 

दरम्यान, घटनास्थळांची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी वायरलेसवरुन संदेश दिल्यानंतर पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याप्रमाणे तरुणीच्या वडिलांना वेल्हे पोलिसांनी बोलावून घेतले. तिची ओळख पटली. 

याप्रकरणी, मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार (वय ४७) सहजानंदनग ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी सांगितले कि, माझी मुलगी दर्शना दत्ता पवार ( वय २६) एमपीएसीमधुन महाराष्ट्र राज्यात ६ वी आली असून परिक्षेत्र वनअधिकारी म्हणुन तिची निवड झाली आहे. दि ९ जुन रोजी सत्कारासाठी पुणे येथील स्पॅाटलाईट अॅकॅडमी येथे ती आली होती. त्यानंतर दुस-या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यत संपर्कात होती. त्यानंतर फोन करुनही फोन उचलला नाही. 

अॅकेडमीत चौकशी केल्यानंतर समजले कि दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे हे दोघे किल्ले सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दोघेही संपर्कात आले नसून परत माघारी देखील आले नाहीत. त्यामुळे पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये मुलगी दर्शना दत्ता पवार हिची हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वेल्हे पोलिसांचा फोन मुलीच्या वडिलांसोबत असलेला आदील जाधवांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर घटनास्थळी गेल्यानंतर माझीच मुलगी दर्शना दत्ता पवार असल्याचे वडील दत्ता पवार यांनी सांगितले. हा घातपात आहे कि आत्महत्या याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंदुबर आडवाल, ज्ञानदिप धिवार व इतर पोलीस करीत आहेत. सतीच्या माळावरुन मयताला पायथ्याशी आणण्यासाठी पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ,व गावातील युवकांनी केले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेRaigadरायगडPoliceपोलिस