शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली, रेस्टॉरंट चालकाला आयोगाचा दणका

By नम्रता फडणीस | Updated: March 12, 2025 14:06 IST

हा नियम हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना बंधनकारक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिली

पुणे : केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या निर्देशानुसार भारतातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना ग्राहकांकडून सेवा शुल्काची वसुली न करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन करून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिल्याप्रकरणी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बाणेरच्या द टेंथ फ्लोअर रेस्टॉरंटला दणका दिला आहे. हॉटेलने तक्रारदाराकडून सेवा शुल्कापोटी घेतलेले ७२७ रुपये तसेच नुकसानभरपाईपोटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रितपणे १० हजार रुपये तक्रारदाराला द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले आहेत. 

आयोगाचे अध्यक्ष अनिल बी. जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे आणि सरिता एन. पाटील यांनी हा निकाल दिला आहे. आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत ही रक्कम न दिल्यास ७२७ रुपयांवर वार्षिक ८ टक्के व्याज आकारण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जाब देणार यांची आतिथ्य डायनिंग ही भागीदारी संस्था असून, या संस्थेचे द टेंथ फ्लोअर नावाचे बाणेर येथे रेस्टॉरंट आहे. तक्रारदार आणि त्यांचे मित्र सहकुटुंब दि. १६ जानेवारी २०२२ मध्ये द टेंथ फ्लोअर येथे दुपारी जेवणासाठी आले होते. तक्रारदारांचे जेवण झाल्यांनतर दिलेल्या बिलामध्ये सेवा शुल्काची रक्कम नमूद करण्यात आली होती. हे शुल्क देण्याबाबत तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली असता, तेथील कर्मचाऱ्याने सेवा शुल्काची रक्कम द्यावीच लागेल, असे सांगितले. तक्रारदारांनी कोणताही वाद न घालता सेवा शुल्काची रक्कम दिली.जाबदारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांची जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वीच रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने तक्रारदाराला रेस्टॉरंट हे १० टक्के सेवाशुल्क आणि इतर सरकारी कर बिलावर आकारते याची कल्पना दिली होती. केवळ जाबदारांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही तक्रार केली असल्याने ती फेटाळण्यात यावी, अशी मागणी जाबदारांनी केली. मात्र, जाबदारांना संधी देऊनही त्यांनी पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तसेच त्यांच्या वतीने तोंडी युक्तिवादासाठी कुणीही हजर राहिले नाही.

केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या निर्देशानुसार भारतातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटच्या ग्राहकांकडून सेवा शुल्काची वसुली न करण्याची जबाबदारी आहे. हा नियम हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना बंधनकारक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिली आहे. ही रेस्टॉरंटची कृती ग्राहकाला मानसिक त्रास देण्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे जाबदार रेस्टॉरंट चालकाला दिलेली रक्कम परत मिळण्यास ग्राहक पात्र असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवित वरील आदेश दिला. तक्रारदारातर्फे ॲड. माहेश्वरी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड