शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी

By श्रीकिशन काळे | Updated: September 26, 2023 20:35 IST

आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

पुणे : रात्री साडे सात वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांना अक्षरशः पावसाने झोडपले. पावसाने परतीचा प्रवास सुरू केला असून, पुणे शहरात आज दुपारपर्यंत आकाश निरभ्र होते. त्यानंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदा मॉन्सून उशीरा आला आणि आता परतीचा प्रवास देखील उशीराच सुरू झाला आहे. राजस्थानमधून पाऊस परतीला लागला आहे. महाराष्ट्रातील तारीख १० ऑक्टोबर देण्यात आलेली आहे. परंतु, त्यापूर्वीच महाराष्ट्रातून तो परत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्राभर मॉन्सून सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेGaneshotsavगणेशोत्सव