सशांना दत्तक घेण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:00+5:302021-02-05T05:21:00+5:30

शहा म्हणाले, दीड वर्षापासून आदिनाथ सोसायटीमधील पदाधिकारी ससे आणि मासे पाळत होते. लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात त्यांना कैद केले होते. ...

Pune residents should take initiative to adopt rabbits | सशांना दत्तक घेण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा

सशांना दत्तक घेण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा

शहा म्हणाले, दीड वर्षापासून आदिनाथ सोसायटीमधील पदाधिकारी ससे आणि मासे पाळत होते. लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात त्यांना कैद केले होते. तर शेजारीच विशिष्ट प्रजातीचे मासेही पाळले होते. सशाना खाद्य आणि माशांना ऑक्सिजनही न दिल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र जैन आणि सचिव राहुल मेहता यांनी नागरिकांच्या मनोरंजनासाठी त्यांना ठेवले होते. प्राणी संरक्षण कायद्यानुसार ससे आणि माशांची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याने अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरोधात पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर ससे आणि मासे यांच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यावर सुनावणी करत सशांना दत्तक घेण्याचे आणि माशांना नैसर्गिक जलाशयात सोडण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेता सद्यस्थितीत सशांचा ताबा जीवसेवा फाउंडेशनकडे द्यावा. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. तर माशांना नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडण्यात यावे, असे नमूद केले आहे.

ससे जीवसेवा फाउंडेशनकडे सोपविले आहेत. म्हणून जास्तीत जास्त पुणेकरांनी सशांना दत्तक घ्यावे.

Web Title: Pune residents should take initiative to adopt rabbits