शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उन्हाळ्यात पुणेकरांना मिळतोय गारवा..! किमान तापमान घसरले; पारा १३ अंशावर

By श्रीकिशन काळे | Updated: March 7, 2025 17:37 IST

महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर व उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये धडकल्याने थंडी वाढली आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपूर्वी पुणेकरांना रात्री व दिवसाही उकाड्याने हैराण केले होते. पण गुरूवारपासून (दि.६) उकाडा कमी होऊन गारठा अनुभवायला येत आहे. किमान तापमान १३ अंशावर गेल्याने सकाळी पुणेकर थंडीने गारठून जात आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे हा गारठा निर्माण झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. 

राज्यामध्ये दोन दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यामध्ये थंडी पडली आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, बुधवारपासून उत्तर भारतातून उत्तर दिशेने महाराष्ट्राकडे थंड वारे येत आहे. हे वारे महाराष्ट्रातील संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच नाशिक, नगर व उत्तर जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये धडकल्याने थंडी वाढली आहे. गेल्या दीड महिन्यापासून बंगालच्या उपसागरातून पूर्वीय दिशेचे दमट व आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या एकसूरी वहनातून उत्तर दिशेने महाराष्ट्रात थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव होत होता.

तो अटकाव वारा वहन प्रणालीतील बदलातून जाणवत आहे. ही तापमानाती चढ-उतार पुढील काही दिवस राहणार आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला आहे. ही परिस्थिती शनिवारपर्यंत (दि.८) राहण्याची शक्यता आहे.’’पुण्यामधील किमान तापमानात तीन-चार अंशाने घसरण झाली आहे. त्यामु शुक्रवारी (दि.७) एनडीए १३.०, बारामती १२.३, शिवाजीनगर १३.२ अंशावर नोंदवले गेले. दुपारी देखील गारवा जाणवत होता. दोन दिवस झाले पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.

पुणे किमान तापमान :बारामती : १२.३एनडीए : १३.०माळिण : १३.१राजगुरूनगर : १३.६इंदापूर : १४.२कोरेगाव पार्क : १८.४चिंचवड : १९.८मगरपट्टा : २०.०वडगावशेरी : २१.१

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामान अंदाज