शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: सरकार आमच्या मरणाची वाट बघतंय का?; रेमडेसिविर मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 09:05 IST

relatives of corona patients agitated after not getting remdesivir injection: रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्यानं कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप

पुणे: पुण्यातील कोरोनाबााधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्याला रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. नातेवाईकांनी बंडगार्डन चौक अडवला असून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. रेमडेसिविर मिळत नसल्यानं नातेवाईक हतबल झाले असून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. (in pune relatives of corona patients agitated after not getting remdesivir injection)कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेलसरकार, प्रशासनाकडून रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्यानं रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज सकाळी बंडगार्डन चौकात ठिय्या दिला. काळ्या बाजारात इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार यापैकी अनेकांनी केली. नातेवाईकाला इंजेक्शन नाही तर मृत्यूचा दाखला घ्यायचा का?, असा सवाल आंदोलन करत असलेल्या गीता गोयल यांनी उपस्थित केला. गीता यांचे पती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमच्यासमोर इतरांना इंजेक्शन देतात. पण आम्हाला देत नाहीत. मी गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे फिरतेय. पण इंजेक्शन मिळालेलं नाही. सरकार आमच्या मृत्यूची वाट बघतंय का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.बुधवारी संध्याकाळपर्यंत रेमडेसिविरचा पुरवठा नाहीराज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा ब-यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी होत असल्याने व अनेक हॉस्पिटलकडून तुमच्या पेशंटला दोन तासात रेमडेसिविर उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही जबाबदारी घेणार नाही असे वारंवार सांगितले जात असल्याने बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली. ...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंतीपुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु दररोज रुग्णसंख्या  वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीदेखील वाढतच आहे. सध्या अनेक खाजगी हॉस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अधिक केला जात असून यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

हॉस्पिटलकडून पेशंटच्या जिवाशी खेळ कोरोनामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पण रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. काही करून दोन तरी रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्या, अन्यथा तुमच्या पेशंटची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असे सांगून सध्या काही हॉस्पिटल  पेशंटच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच काही हॉस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक प्रमाणात पेशंटला रेमडेसिविर इंजेक्शनचा डोस दिला जात असल्याचे भरारी पथकातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या