शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rave Party : खडसे कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट? एकनाथ खडसे यांचा पोलिस तपासावर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:34 IST

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुणे -  खराडीतील ‘स्टे बर्ड हॉटेल’मध्ये रविवारी पहाटे झालेल्या ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.एकनाथ खडसे म्हणाले, ही कारवाई मुद्दामून आमच्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी रचलेली योजना आहे. त्यांनी पोलिसांची कारवाई, ड्रग्ज रिपोर्टचा अभाव, माध्यमांमध्ये फुटलेली माहिती आणि प्रांजल खेवलकर यांना केलेला प्राथमिक आरोपी यावरून अनेक मुद्दे उपस्थित केले.खडसे पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी झाली, तिथे ना मोठा गोंधळ होता ना संगीत, मग रेव्ह पार्टी कशी? पोलिसांनी कारवाईचे व्हिडिओ मीडिया हाती दिले, यामागे काय हेतू होता? चेहऱ्यांचा प्रसार करून बदनामी केली जात आहे.  प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही पूर्व गुन्हा नाही, तरी त्यांना 'मुख्य आरोपी' का घोषित केले? अमली पदार्थ एका महिलेच्या बॅगमधून सापडले, तरी तिला प्रमुख आरोपी न करता प्रांजल यांना का लक्ष्य केलं? दारूचा रिपोर्ट तातडीने मीडियात कसा पोहोचतो, पण ड्रग्ज चाचणीचा अहवाल अद्याप का मिळत नाही?  माझ्यावरही पोलिसांकडून पाळत ठेवली जात होती. साध्या वेशातील पोलिस वेस्टिन हॉटेलच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्हीत दिसतात  हे संशयास्पद नाही का?  असे प्रश्न  विचारत खडसे यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.    

राजकीय सूडभावनेचा आरोपखडसे म्हणाले, हे फक्त ड्रग्ज पार्टीचे प्रकरण नाही, हे आमच्या कुटुंबावर डाग लावण्याचे षडयंत्र आहे.  त्यांनी नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरण, तसेच प्रफुल लोढा प्रकरणांचा दाखला देत सरकारच्या दुहेरी भूमिकेवरही टीका केली. एका बाजूला तत्काळ कारवाई होते, तर दुसऱ्या बाजूला ठोस पुरावे असूनही गप्प बसले जाते. असा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी, प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचे ब्लड सॅम्पलदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याबाबत वैद्यकीय तपासणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, प्रांजल खेवलकर  आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ड्रग्सचे सेवन केले होते का नाही?  हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड