शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

Pune Rain: खडकवासला, पानशेत धरणे १०० टक्के भरली; मुठा नदीमध्ये विसर्ग वाढणार

By नितीन चौधरी | Updated: September 13, 2022 10:26 IST

येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार...

पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधारा सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढली आहे. यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात सतत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दोन तासांत मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून आज स. ११:०० वा. ३ हजार ४२४ क्यूसेक्स करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाDamधरणRainपाऊस