पुणे रेल्वे स्टेशन होणार ग्रीन
By Admin | Updated: January 1, 2016 04:27 IST2016-01-01T04:27:42+5:302016-01-01T04:27:42+5:30
पुणे रेल्वे स्टेशन लवकरच सौर ऊर्जेवर झगमगणार आहे़ स्टेशन परिसरात सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होणार असून, त्याची जबाबदारी पर्सिस्टंट फाउंडेशनने घेतली आहे़

पुणे रेल्वे स्टेशन होणार ग्रीन
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन लवकरच सौर ऊर्जेवर झगमगणार आहे़ स्टेशन परिसरात सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होणार असून, त्याची जबाबदारी पर्सिस्टंट फाउंडेशनने घेतली आहे़
पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी़ के़ दादाभोय, अतिरिक्त व्यवस्थापक मिलिंद देउस्कर, पर्सिस्टंटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ़ आनंद देशपांडे तसेच चेअरपर्सन सोनाली देशपांडे, विश्वस्त पी़ के़ भार्गव, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा, एस़ एम़ राजपूत यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षरी करण्यात आली़ पर्सिस्टंट फाउंडेशन ही पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या कॉपोरेट कंपन्यांची सामाजिक जबाबदारी अंतर्गत (सीएसआर) स्थापन करण्यात आली आहे़
पर्यावरणाचे रक्षण आणि पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)
कंपनी स्टेशन परिसरातील आरक्षण कार्यालयाच्या छतावर सौरऊर्जेची ६०० पॅनल उभारणार असून, त्यातून १५० किलोवॅट वीज निर्माण होईल़ या सौरऊर्जा प्रकल्पातून पुणे स्टेशनला दरवर्षी २ लाख २० हजार युनिट वीज उपलब्ध होणार आहे़ त्यातून रेल्वे स्टेशनमधील दिवे आणि पंखे अशी १२०० उपकरणे या सौरऊर्जेवर चालणार आहेत़ त्यामुळे वीजबिलात सुमारे २२ लाख रुपयांची बचत होणार आहे़