शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

India Post : पोस्टाच्या पाकिटांवरून देशभर पोहोचणार पुण्याची अंजिरे

By नितीन चौधरी | Updated: October 12, 2022 14:24 IST

तुम्ही सासवडला गेल्यावर अंजीर खाल्ली का, असा प्रश्न जरूर विचारला जातो....

पुणे : शेती उत्पादनात पुणे जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे, असा साधा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर पुरंदरची अंजिरे, मावळातला आंबेमोहोर, जुन्नरचे टोमॅटो येतात. अंजीर व आंबेमोहोर या दोन उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळालेच आहे. आता हेच तीन पिके पोस्टाच्या पाकिटांवरही अवतरली आहेत.तुम्ही सासवडला गेल्यावर अंजीर खाल्ली का, असा प्रश्न जरूर विचारला जातो. राज्यातील बहुतांश जणांना याची कल्पना आहे. आता देशभर पुण्याच्या अंजिरांची ख्याती पोहोचणार आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांच्या तोंडातही पुण्याच्या अंजिरांची गोडी पोहोचणार आहे. अंजिरासह आंबेमोहोर तांदळाची, टोमॅटोचीही प्रसिद्धी होणार आहे.

भारतीय पोस्टाने पुण्याच्या उत्पादनांना हा सन्मान दिला आहे. ही तिन्ही उत्पादने पोस्टाच्या पाकिटांवर झळकली आहेत. भौगोलिक मानांकनप्राप्त आंबेमोहोर तांदूळ, पुरंदर, अंजीर आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या गटातील टोमॅटोही उत्पादने देशभर जाणार आहेत.

‘आझादी का अमृतमहोत्सव’ वर्षातील ‘फिलेटेली’ दिनानिमित्त या विशेष टपाल आवरणांचे विमोचन पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते झाले. यावेळी डाकसेवा संचालक सिमरन कौर, डेक्कन फिलाटेलिक सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. अंजली दत्ता, कर्नल आर. के. चव्हाण (निवृत्त), अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब काळभोर, मुळशी तालुका आंबेमोहोर संवर्धन संघाचे अध्यक्ष हरिष मेंगडे उपस्थित होते.

भौगोलिक मानांकनप्राप्त या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांतही असेच अनावरण करण्यात आले आहे. ही विशेष पाकिटे पुणे हेड पोस्ट ऑफिस, पुणे सिटी पोस्ट ऑफिस आणि पुणे टपाल क्षेत्रातील नगर, बारामती, कराड, पंढरपूर, सातारा, सोलापूर आणि श्रीरामपूर येथील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.- रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल

 

या विशेष पाकिटांमुळे कार्यालयीन संवादाद्वारे पुण्याच्या या खासियतची प्रसिद्धी होणार आहे. राज्यात याबाबत माहितीच आहे. मात्र, यानिमित्ताने अंजीर, आंबेमोहोर व टोमॅटो देशभर पोहोचणार आहे. त्यातून मार्केटिंगलाही हातभार लागणार आहे.- रोहन उरसळ, अंजीर निर्यातदार, सासवड.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरPost Officeपोस्ट ऑफिस