शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:01 IST

Pune Porsche Accident : पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे.

पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांबाबत भीती व्यक्त केली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर  यांना पोलिस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.   

ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

"डॉ. अजय तावरे यांची अटक झाली आहे,  अटक झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे भरपूर नावे आहेत, मी कुणालाही सोडणार नाही, असं वाक्य उच्चारलं आहे. अशावेळी एक की विटनेस म्हणून डॉ. अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची ठरते. पुरावे नष्ठ करण्याच्या दृष्टीने अजय तावरे यांच्या जीवाला धोका का होणार नाही, अशी भीती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.  

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही पोस्ट करुन मागणी केली आहे. "४ जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.  पण तोवर डॉ. अजय तावरे च्या जीविताची सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते, असंही अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

'बाळा'च्या वडिलांनी डॉक्टरांना १५ कॉल केले

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी ८:३० ते १०:४० च्या सुमारास झाले होते आणि सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

तत्पूर्वी, पोलिसांनी १९ मेरोजी झालेल्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा केला होता. यानंतर, सरकारी रुग्णालयाती फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि एक कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या लोकांनी पैशांच्या लालसेपोटी आरोपीचे ब्लड सॅम्पल बलल्याचा आरोप आहे. यामुळे कार चालक आरोपीने दारू प्यायल्याची पुष्टी झाली नव्हती.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात