शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस इंडिया सायबर कॉप; यूपीआय अ‍ॅप घोटाळ्याचा तपास वैशिष्ट्यपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:36 IST

सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला. पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आले.

पुणे : सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला. पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आले आणि १८ गुन्हेगार जेरबंद केले़ तसेच पुणे शहरात दाखल झालेल्या यूपीआय अ‍ॅप घोटाळ्यातील ६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या गुन्ह्यांचा चार महिने अविरत तपास करून गुन्हेगारांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांचा वैशिष्ट्यपूर्ण तपास लावल्याबद्दल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.पुणे पोलीस दलात कार्यरत असताना वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून होणारा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला होता. या पुरस्कारासाठी देशभरातून २२६ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील तीन प्रवेशिकांची निवडून त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये केरळ, कोलकाता आणि पुणे पोलिसांचा समावेश होता.या तीन यंत्रणांच्या तपासातून एकाची निवड होणार होती. त्यानुसार पहिले पारितोषिक केरळ पोलिसांना जाहीर झाले तर पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी मिळाली.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस