शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Covid oxygen crisis : पुण्याने करून दाखवलं!; २४ तासांत भागवली शहराच्या ऑक्सिजनची गरज

By प्राची कुलकर्णी | Updated: April 22, 2021 20:49 IST

२४ तासांत उद्योजक आणि प्रशासनाने एकत्र येत केली १२ ऑक्सिजन प्लांटची खरेदी.

पुणे: नाशिकमध्ये ऑक्सिजन अभावी २२ लोकांना जीव गमवावा लागला . पण त्याच्याच एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी पुण्यातही अशी परिस्थिती ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे येतेय का काय अशी अवस्था होती. पण उद्योजक आणि प्रशासनानने एकत्र येत २४ तासांच्या आत जिल्ह्याची गरज तर भागवलीच पण त्यात बरोबर १२ नवे ॲाक्सिजन जनरेटर प्लांट खरेदी करत शहरासाठी पुढचा काळातली देखील तरतूद केली आहे. मंगळवारचा दिवस पुण्यात उजाडला तोच ॲाक्सिजनचा तुटवड्याने .. कुठे रुग्णालयांनी पेशंट घेणं थांबवले तर कुठे पेशंटना शिफ्ट करायची धावपळ सुरु होती. या गोंधळातच ॲाक्सिजन मिळवण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी रात्रभर जागुन प्रयत्न करत होते.. पण आभाळ फाटले तर ठिगळं किती लावणार अशी परिस्थिती.. मग सुरु झाली ती युद्धपातळीवरची धावपळ. एकीकडे ॲाक्सिजन पुरवठा आहे त्यात तो भागवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दुसरीकडे नव्याने ॲाक्सिजन पुरवठा कसा होईल याची धावपळ सुरु होती. पहिल्या टप्प्यात ॲाडिट करुन ॲाक्सिजनची गरज कमी केली. पेशंटला गरजे इतकाच ॲाक्सिजन पुरवला जाईल यासाठी प्रयत्न सुरु झाले. दिवसभरातच खासगी रुग्णालयातले १२०० तर सरकारी रुग्णालयांमधले ३०० पेशंट हे स्टेप डाऊन पद्धतीने त्यांच्या गरजेच्या ट्रीटमेंटला शिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे रुग्णालयांच्या गरजेनुसार ॲाक्सिजन पुरवण्यासाठी धडपड केली गेली. पण हे देखील पुरेसं नव्हतं.  विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मते “ दोन दिवसांच्या धावपळीनंतर गरजेइतकाच पुरवठा मिळत आहे. आता औद्योगिक क्षेत्रातुन मदत उभी राहाते आहे. काही कंपन्या ज्या सध्या बंद आहेत त्या ॲाक्जिन पुरवठा करायला पुढे आल्या आहेत. याबरोबरच जे एस डब्ल्यु कडुन ३० मेट्रिक टन पुरवठा सुरु झाला आहे. पण ते देखील पुरेसं ठरणार नाहीये. गरज वाढली तर काय यासाठी तयारी करणं गरजेचं होतं.”अशातच पुणे प्लॅटफॅार्म फॅार कोव्हीड रिस्पॅान्स चा सुधीर मेहता यांना औरंगाबादच्या एका कंपनीच्या माणसाकडे १२ ॲाक्सिजन जनरेटर  प्लांट असल्याची माहिती मंगळवारी रात्री मिळाली. “ मला रात्री कळालं की आत्ताचे शेवटचे तयार १२ प्लांट या कंपनी कडे उपलब्ध आहेत. मंगळवारी रात्री कळाल्यावर तातडीने त्याच्या मालकाशी संपर्क साधला. त्याला हे प्लांट पुण्यासाठी राखीव ठेवायला सांगितलं.. अर्थात हे केलं तरी पैसे देई पर्यंत ते प्लांट मिळणार नव्हतेच. मग अधिकारी आणि वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधुन पैसा उभा करण्याची धडपड सुरु झाली. वेळ कमी होता आणि काम जास्त. थोडा उशीर झाला तर ते प्लांट इतर कुठे दिली जाण्याची भीती होती असे सुधीर मेहता म्हणाले. अखेर उद्योजक प्रशासन आणि राजकारणी एकत्र आले आणि आज १२ प्लांट खरेदी करण्याच्या ॲार्डरही गेल्या. यासाठी बजाज , टाटा आणि रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनने पैसा उभा केला. तर महापालिकेने थेट महापौर निधीच खर्च करायचं ठरवलं. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “ पुणे शहरासाठी महापौर निधीमधुन दीड कोटींची तरतूद करुन प्लांट घेतला आहे. हा प्लांट नायडू रुग्णालयात बसवला जाणार आहे. त्यातुन आपल्याला मोठा दिलासा मिळेल. साधारण दहा दिवसांत हा प्लांट कार्यान्वीत होईल.” पुढच्या काही दिवसांत खासगी आणि सरकारी रुग्णालयातून हे प्लांट बसवले जातील. याबरोबरच ॲाक्सिजन कॉन्संट्रेटर देखील खरेदी केले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका