Pune ZP Election 2026: महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच पुणे भाजपाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे नेते राजेश पांडे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
पुणे भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलावण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणनीतीबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पाटील आणि इतर वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक पार पडताच भाजपाने जिल्हा परिषदेवर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचेच मोठे आव्हान आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सोबत जाणे टाळले होते. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शतप्रतिशत भाजपा अशा पद्धतीने रणनीती सुरू केली आहे.
कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका?
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांचा यात समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यासाठी निवडणूक?
सिंधुदुर्ग - ८
रत्नागिरी - ९
रायगड -१५
पुणे - १३
सातारा - ११
सांगली - १०
सोलापूर - ११
कोल्हापूर - १२
छत्रपती संभाजीनगर - ९
परभणी - ९
धाराशिव - ८
लातूर - १०
Web Summary : Following Pune and PCMC election results, BJP strategizes for Zilla Parishad and Panchayat Samiti polls. Key leaders will discuss strategy, focusing on challenges from NCP factions and aiming for a strong BJP presence in upcoming local elections across multiple districts.
Web Summary : पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या निकालानंतर, भाजपा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांकडून असलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करून आगामी स्थानिक निवडणुकीत भाजपाची मजबूत उपस्थिती दर्शवणार.