शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Omicron : पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, मैदाने, पर्यटनस्थळावरील दुकाने, हॉटेल्स सोमवारपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 21:54 IST

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती. कलम १४४ रद्द करण्याचा निर्णय

पुणे : कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंट प्रसार मोठा आहे. परंतु, तो गंभीर नसल्याचे मागील १५ दिवसांतील आकडेवारीनुसार सिद्ध झाले आहे. सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे सोमवार (दि. २४) पासून खुली करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केले. तसेच या आदेशानुसार लागू असलेले कलम १४४ रद्द करण्यात आले आहे.

कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसाराच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील सर्व विभाग प्रमुख व टास्क फोर्स यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव असूनही रुग्णाचे रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचे प्रमाण फार कमी आहे. पुणे जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध टप्याटप्याने कमी करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरवले. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे सोमवार (दि. २४) पासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना अधिकार देण्यात आले आहे. तर पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पुणे महापालिका क्षेत्रात तर देहूरोड छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात होत आहे. त्यामुळे तेथील निर्णय घेण्याचे अधिकार दोन्ही महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांचा सराव करता येणारराज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या स्पर्धात्मक सरावासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव सुरू करण्यात येत आहेत. तसेच फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४(१)(३) अन्वये देण्यात आलेला आदेश या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे.

कोरोना नियमांचे पालन बंधनकारकमास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण, सॅनिटायझेशन या बाबतच्या नियमांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालन करणे बंधनकारक आहे, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन